स्मिता आयएएसच्या प्राथमिक परीक्षेत नापास झाल्या होत्या. सन २००० मध्ये त्यांनी दुसरा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी केवळ परीक्षाच उत्तीर्ण केली नाही तर चौथी रँक देखील मिळवली.
आयएएस स्मिता सभरवाल यांना जनता अधिकारी म्हणूनही ओळखले जाते. आयएएस अधिकारी म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्या देशभरातील आयएएस इच्छुकांसाठी त्या एक प्रेरणा बनल्या आहेत. २००० च्या यूपीएससी परीक्षेत चौथी रँक मिळवून त्या आयएएस टॉपर बनल्या होत्या.
असा केला अभ्यास
स्मिता या मूळच्या दार्जिलिंगच्या आहेत. स्मिता यांनी नववीपर्यंतचे शिक्षण हैदराबादमध्ये घेतले त्यानंतर सेंट अॅन्स, मरेडपल्ली, हैदराबाद येथून बारावी पूर्ण केली. त्यानी आयसीएसई बोर्डातून बारावीमध्ये ऑल इंडिया फर्स्ट रॅंक मिळवला होता. त्यानंतर त्यांनी सेंट फ्रान्सिस डिग्री कॉलेज फॉर वुमनमधून बी.कॉम केले.
आयएएस स्मिता सभरवाल या सन २००० च्या बॅचच्या IAS आहेत आणि आपल्या कामामुळे अनेकदा चर्चेत असतात. कठोर अभ्यास करूनच आपण नागरी सेवांमध्ये यश मिळू शकते, असा विचार करणे चुकीचे आहे. निवडीच्या अंतिम फेरीसाठी तुमच्या आवडीनिवडी आणि छंदही विचारात घेतले जातात. त्यामुळे याकडेही लक्ष द्या असा सल्ला त्या तरुणांना देतात.