रिसर्च फर्म Global Monthly Handset Model Sales Tracker ने काही खास आकडेवारी शेअर केली आहे. अॅपल अशी कंपनी आहे. जिने टॉप १० बेस्ट सेलिंग स्मार्टफोनच्या लिस्टमध्ये ८ नंबरवर स्थान मिळवले आहे. २०२२ मध्ये एकूण ग्लोबल स्मार्टफोनचे जवळपास १९ टक्के भाग या लिस्टमध्ये समावेश असलेल्या टॉप १० डिव्हाइसचा आहे.
iPhone 13 सर्वात जास्त विकणारा स्मार्टफोन
२०२२ चा बेस्ट सेलिंग स्मार्टफोन आयफोन १३ ठरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयफोनची एकूण ग्लोबल सेल मध्ये २८ टक्के भाग या फोनचा आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये लाँच करण्यात आल्यानंतर ऑगस्ट २०२२ पर्यंत अॅपल पर्यंत आयफोन १३ प्रत्येक महिन्यात सर्वात जास्त विकणारा फोन ठरला आहे. आयफोन १३ ची सर्वात जास्त विक्री चीन, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्समध्ये झाली आहे. तर आयपओन १४ सीरीज लाँच झाल्यानंतर डेव्हलपिंग मार्केटमध्ये या फोनच्या किंमतीत कपात झाल्यानंतर आयफोन १३ च्या किंमतीत जास्त वाढ झाली आहे.
वाचाः Tips and Tricks: उन्हाळ्यात AC चालवण्याआधी हे काम न केल्यास विजेचे बिल येईल भरमसाठ
आयफोन १३ नंतर सर्वात जास्त iPhone 13 Pro Max आणि iPhone 14 Pro Max ची विक्री झाली आहे. डेटाच्या माहितीनुसार, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२२ मध्ये टॉप सेलिंग आयफोन मध्ये iPhone 14 Pro Max चा समावेश आहे. iPhone 13 Pro पाचव्या, iPhone 12 सहाव्या, iPhone 14 सातव्या, iPhone 14 Pro आठव्या आणि iPhone SE 22 नवव्या नंबरवर स्थान मिळवले आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए १३ चौथ्या स्थानावर तर गॅलेक्सी ए ०३ ने या लिस्टमध्ये दहाव्या नंबरवर स्थान मिळवले आहे.
वाचाः OnePlus TV चा ओपन सेल सुरू, ५ हजार रुपयांची थेट सूट, टीव्हीची किंमत-फीचर्स पाहा