जिओचा ३९५ रुपयाचा प्लान
या प्लानमध्ये यूजर्सला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. सोबत एकूण ६ जीबी डेटा दिला जातो. हा हाय स्पीड डेटा मिळतो. याशिवाय, डेटा संपल्यानंतर स्पीड 64 Kbpsमिळते. या प्लानमध्ये १ हजार SMS दिले जाते. डेटा आणि एसएमएस सोबत कोणताही FUP दिला जात नाही. यासोबत जिओ अॅप्सचे फ्री अॅक्सेस दिले जाते. या प्लानची वैधता ८४ दिवसाची आहे.
वाचाः Tips and Tricks: उन्हाळ्यात AC चालवण्याआधी हे काम न केल्यास विजेचे बिल येईल भरमसाठ
जिओच्या ३९५ रुपयाच्या प्लानशिवाय काही असे प्लान आहेत. ज्याची वैधता ८४ दिवसाची आहे. यात एक ६६६ रुपयाचा प्लान आहे. या प्लानमध्ये ८४ दिवसाच्या वैधते सोबत रोज १.५ जीबी डेटा दिला जातो. सोबत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. रोज १०० एसएमएस दिले जाते. यासोबत जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन सुद्धा दिले जाते.
वाचाः iPhone 13 पुढे सर्वच फेल, जगात या १० फोनची सर्वात जास्त विक्री, चायना फोनला स्थान नाही
७१९ रुपयच्या प्लानमध्ये सुद्धा ८४ दिवसाची वैधता दिली जाते. सोबत अनलिमिटेड कॉलिंग, रोज २ जीबी डेटा, रोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. जिओच्या ११९९ रुपयाच्या प्लानमध्ये सुद्धा ८४ दिवसाची वैधता मिळते. यात रोज ३ जीबी डेटा दिला जातो. सोबत १०० एसएमएस दिले जाते. अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते.
वाचाः Airtel च्या या रिचार्जचा धुमाकूळ, किंमत फक्त १९ रुपये, पाहा बेनिफिट्स