देशातील विद्यापीठांमध्ये अध्यापनाचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. याआधी विद्यापीठांमध्ये अध्यापनासाठी पीएचडी पदवी अनिवार्य होती. पण आता नव्या नियमामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
उस्मानिया विद्यापीठ (OU) कॅम्पसमध्ये नव्याने बांधलेल्या UGC-HRDC इमारतीचे उद्घाटन यूजीसी अध्यक्षांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. एक राष्ट्र-एक डेटा पोर्टल विकसित केले जात आहे, ज्यामध्ये सर्व यूजीसी मार्गदर्शक तत्त्वे आणि इतर तपशील असतील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. पुढील शैक्षणिक वर्षापासून पारंपरिक पद्धतीतील शिक्षणासोबतच नॅशनल डिजिटल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
नवीन इमारत ही ओयूमधील विद्यमान पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर घालणारी आहे आणि देशभरातील उच्च शिक्षणातील अध्यापन बंधुत्वाला मोठे योगदान देईल, असे तेलंगणा राज्य उच्च शिक्षण परिषदेचे अध्यक्ष प्रा. आर लिंबाद्री म्हणाले.
उस्मानिया विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डी रविंदर यांनी विद्यापीठाच्या पुढाकार आणि प्रगतीबद्दल सांगितले. विद्यापीठात टक्के प्रशासकीय पदे महिला प्राध्यापकांसाठी राखीव ठेवण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.