नवा कोणताही सिनेमा थिएटरमध्ये नसल्याने TJMM चा फायदा
‘तू झुठी मैं मक्कर’ या चित्रपटाला मिळणारा पहिला फायदा म्हणजे सध्या चित्रपटगृहांमध्ये इतर कोणताही नवा सिनेमा नाही आहे, त्यामुळे प्रेक्षकांसमोर दृष्टीने हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. सुट्टीचा दिवस नसूनही, रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरच्या चित्रपटाने पहिल्या मंगळवारी म्हणजेच ७ व्या दिवशी ५ कोटींची कमाई केली. सोमवारच्या तुलनेत सिनेमाची कमाई घटल्याचे चित्र आहे, कारण सोमवारी ही कमाई ५.२५ कोटींची होती.
शहरांमध्ये चांगली कमाई
‘तू झुठी मैं मक्कर’ या सिनेमाला महानगरांमध्ये फायदा होत आहे. दिल्ली, यूपी, पंजाबपासून ते मुंबईपर्यंत प्रेक्षकांमध्ये सिनेमाची क्रेझ पाहायला मिळाली. याठिकाणी सिनेमाने सर्वाधिक गल्ला कमावला आहे. दरम्यान भोपाळ, बरेली, बडोदासारख्या शहरांमध्येही सिनेमाची कमाई वाढत आहे.
TJMM चे आतापर्यंतचे बॉक्स ऑफिस कलेक्शन
बुधवार- १४ कोटी रुपये
गुरुवार- ९ कोटी रुपये
शुक्रवार- ८.५० कोटी रुपये
शनिवार- १३.७५ कोटी रुपये
रविवार- 14.50 करोड़ रुपये
सोमवार- ५.२५ कोटी रुपये
मंगलवार- ५ कोटी रुपये
एकूण कमाई- ७० कोटी रुपये (बॉक्स ऑफिस इंडियाच्या माहितीनुसार)
५० दिवस बॉक्स ऑफिसवर पठाण
पठाणच्या मेकर्ससाठी ही आनंदाची बातमी आहे की हा सिनेमा गेले ५० दिवस आहे. अजूनही सिनेमाची कमाई सुरू आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन ७ आठवडे उलटले, तरीही प्रेक्षकांमध्ये सिनेमाची क्रेझ पाहायला मिळते आहे. शाहरुखच्या ‘पठाण’ नावाच्या वादळापुढे शहजादा, सेल्फी हे सिनेमे चांगलेच आपटले होते.
४९ व्या दिवशी पठाणची कमाई
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, पठाणने मंगळवारी ०.२४ कोटींची कमाई केली. सोमवारच्या तुलनेत ही कमाई ४ टक्क्यांनी वाढली आहे. परदेशातही पठाणची चांगली कमाई होत असून, देशभरात अद्याप सिनेमाने ५४० कोटींचा गल्ला कमावला आहे.
पठाणचे बॉक्स ऑफिस कलेक्शन (हिंदी)
पहिला आठवडा- ३४८ कोटी रुपये (नऊ दिवस)
दुसरा आठवडा- ९० कोटी रुपये
तिसरा आठवडा-४४.९० कोटी रुपये
चौथा आठवडा- १३.७४ कोटी रुपये
पाचवा आठवडा- ०८.७० कोटी रुपये
सहावा आठवडा- ०८.५० कोटी रुपये
सातवा आठवडा- ०१.६५ कोटी रुपये (बॉक्स ऑफिस रिपोर्टनुसार)