बीएसएनएलचा १९७ रुपयाचा प्रीपेड प्लान
या प्लानला कंपनीने पहिल्यांदा २०२१ मध्ये आणले होते. बीएसएनएलचा १९७ रुपयाचा रिचार्ज प्लान १८ दिवसाच्या फ्री बिज सोबत १८० दिवसाच्या वैधते सोबत येत होता. परंतु, आता कंपनीने या प्लानमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्समध्ये बदल केला आहे. आता बीएसएनएलच्या १९७ रुपयाच्या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग (लोक आणि एसटीडी), डेली २ जीबी डेटा, डेली १०० एसएमएस आणि १५ दिवसासाठी झिंग म्यूझिक कंटेट देत आहे. डेली डेटा लिमिट संपल्यानंतर यूजरला ४० केबीपीएस स्पीडने अनलिमिटेड डेटा यूज करता येवू शकतो. हे बेनिफिट आधी १५ दिवसासाठी होते.
वाचाः Gmail वर आलेल्या अनावश्यक मेल्सने त्रस्त आहात?, अशी चुटकीसरशी समस्या सोडवा, पाहा सोपी ट्रिक्स
प्लानमध्ये ७० दिवसाची वैधता
बीएसएनएलच्या १९७ रुपयाच्या प्रीपेड प्लान मध्ये ७० दिवसाची वैधता मिळते. जी दोन महिन्यापेक्षा जास्त आहे. याचाच अर्थ केवळ २.८० रुपये रोजच्या खर्चात तुम्हाला ही सुविधा मिळते. तुम्ही जर बीएसएनएलचे ग्राहक असाल तर तुम्ही या प्लानचा आनंद घेवू शकतात. प्लानमध्ये आधी १५ दिवसासाठी अनलिमिटेड डेटा, कॉलिंग आणि डेटा सोबत डेली १०० एसएमएस फ्री मिळत होते. या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे १५ दिवसात मिळणारी फ्रीबीज बेनिफिट्स संपल्यानंतर ग्राहक व्हाइस, डेटा आणि एसएमएससाठी वेगळा चार्ज करू शकता. बीएसएनएलचा प्लान अनेक टेलिकॉम सर्कलमध्ये उपलब्ध आहे.
वाचाः AC खरेदी करताना स्टार रेटिंग पाहणे का आहे आवश्यक?, ५ स्टार आणि ३ स्टारमध्ये फरक काय?