AC खरेदी करताना स्टार रेटिंग पाहणे का आहे आवश्यक?, ५ स्टार आणि ३ स्टारमध्ये फरक काय?

नवी दिल्लीः उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाची चटके सुद्धा आता चांगलीच बसू लागली आहेत. अनेक जणांनी कूलर आणि एसी खरेदी करायला सुरुवात केली आहे. परंतु, तुम्ही जर एसी खरेदी करायचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी काही टिप्स देत आहोत. या टिप्स तुम्हाला चांगल्या उपयोगी पडू शकतील. जर तुम्हाला कमी किंमतीत एसी खरेदी करायचा असेल तर काही गोष्टींवर तुम्हाला ध्यान द्यावे लागू शकते. एसी खरेदी करण्याआधी तुम्हाला ३ स्टार आणि ५ स्टार एसी संबंधी माहिती असेल. परंतु, या दोन्ही मध्ये नेमका फरक काय असतो, हे अनेकांना माहिती नाही. याचे नेमके काय फायदे असतात. जाणून घ्या डिटेल्स.

एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार, एनर्जी एफिशियन्सी म्हणजेच विजेची बचत या हिशोबानुसार, एअर कंडिशनला वेगवेगळे रेटिंग्स दिले जातात. पाच स्टार रेटिंग्सच्या एसीला कमी वीज बिल येते. तर तीन स्टार रेटिंगच्या एसीला जास्त एनर्जी लागत असल्याने जास्त वीज बिल येते. परंतु, ५ स्टार एसी ३ स्टार एसीच्या तुलनेत जास्त महाग असतात.

५ स्टार एसीमुळे विजेचे बिल कमी येते
५ स्टार एसीत सर्वात मोठे कंडेंसर दिले जाते. यामुळे इलेक्ट्रिसिटी एफिशियंट असतात. तर ३ स्टार रेटिंग्सच्या एसीत छोटे कंडेंसर असतात. हे काम एनर्जी एफिशियंट असतात. याच कारणामुळे या दोन्ही एसीत विजेच्या बिलात फरक असतो.

तुमच्या माहितीसाठी एक स्टार एसी १.१ यूनिट प्रति तास या हिशोबानुसार, वीज खर्च करते. तर १.५ टनचा ५ स्टार एसी ०.८४ यूनिट प्रति तास या हिशोबाप्रमाणे विजेचे बिल खर्च करतात. सध्या मार्केटमध्ये विक्री केल्या जाणाऱ्या ३ स्टार एसी फिल्टर सोबत येतात. यामुळे हवेने डस्ट आणि पॉल्यूशनला फिल्टर केले जावू शकते. तर टर्बो मोड, स्लीप मोड आणि ईको मोड सारख्या अडवॉन्स्ड मुळे एसी आणखी चांगला होतो.

वाचाः LG 1.5 Ton Split AC ला अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी, सोबत १० वर्षाची वॉरंटी

आजच्या घडीला मार्केटमध्ये स्मार्ट एसीने एन्ट्री घेतली आहे. सर्वसाधारणपणे येणारे एसी दोन प्रकारचे असतात. यात वाय फाय कनेक्टिविटी आणि स्मार्टफोनने ऑपरेट करण्याचे फीचर सुद्धा आहे. कोणत्याही स्थितीत एसीचा रिमोट हरवला असेल तर तुम्ही या एसीला तुमच्या फोनवरून ऑन किंवा ऑफ करू शकता. तसेच टेंपरेचरला कमी किंवा जास्त करता येवू शकते.

वाचाः Aadhaar-PAN Card Link न केल्यास होणार हे ३ नुकसान, पाहा डिटेल्स

Source link

air conditionerair conditioner 1.5 tonAir conditioner 3 starAir conditioner 5 starair conditioner acair conditioner priceair conditioner tips and tricks
Comments (0)
Add Comment