Pune Crime पुणे: खून झालेल्या गुंडाचं ‘बर्थ डे सेलिब्रेशन’; केक कापताच पिस्तूल रोखलं आणि…

हायलाइट्स:

  • पुण्यात खून झालेल्या गुंडाचा वाढदिवस साजरा केला.
  • गावठी पिस्तूल उंचावत केक कापून निर्माण केली दहशत.
  • व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपीला ठोकल्या बेड्या.

पुणे: गावठी पिस्तूल घेऊन आणि मोठमोठ्याने आरडाओरडा करून मृत गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करणाऱ्या व्यक्तीला पुणे गुन्हे शाखेच्या (युनिट-२) पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अक्षय ऊर्फ प्रसाद कानिटकर (रा. बिबवेवाडी) असे आरोपीचे नाव आहे. ( Birthday Celebration Of Murdered Criminal In Pune )

वाचा:CSMT, भायखळा, दादर, अमिताभ यांच्या बंगल्याजवळ बॉम्ब ठेवल्याचा फोन

पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार भावेश कांबळे याचा खून झाला आहे. अक्षय कानिटकर याने १० ते १५ जणांच्या उपस्थितीत सात जुलै रोजी भावेशचा वाढदिवस साजरा केला. त्या वेळी गावठी पिस्तूल घेऊन कांबळे याच्या नावाने घोषणा देऊन, केक कापून त्याने दहशत निर्माण केली. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात फटाक्यांची आतषबाजी सुरू असल्याचे तसेच आरोपी पिस्तूल उंचावून नाचत असल्याचे दिसत आहे.

वाचा: भाजप-मनसे युतीत ‘हा’ अडथळा; पाटील-राज भेटीवर फडणवीस बोलले…

दरम्यान, एका महिन्यानंतर अक्षय कानिटकर पोलिसांच्या हाती लागला आहे. कानिटकर बिबवेवाडीतील नवनाथ दत्त मंदिराजवळ थांबला असून, त्याच्याकडे पिस्तूल आहे अशी माहिती पोलीस अंमलदार मितेश चोरमोले यांना मिळाली होती. त्यानुसार ‘युनिट दोन’च्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता कमरेला गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस सापडले. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीला बिबवेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

वाचा:कोठेवाडीचे आरोपी तुरुंगातून बाहेर येणार?; हायकोर्टाने दिला ‘हा’ आदेश

Source link

birthday celebration of murdered criminalbirthday celebration of murdered criminal in punepune crime akshay kanitkar arrestpune crime bhavesh kamble newspune crime latest newsअक्षय ऊर्फ प्रसाद कानिटकरपुणेबिबवेवाडीभावेश कांबळेमितेश चोरमोले
Comments (0)
Add Comment