Vu चा धमाका, स्वस्त किंमतीतील ४३ इंच आणि ५५ इंचाचे प्रीमियम स्मार्ट भारतात लाँच

नवी दिल्लीः स्मार्ट टीव्ही निर्माता कंपनी Vu ने भारतात आपली नवीन Vu premium Smart TV 2023 edition ला लाँच केले आहे. नवीन प्रीमियम स्मार्ट टीव्हीला ४३ इंच आणि ५५ इंच स्क्रीन व्हेरियंट मध्ये लाँच करण्यात आले आहे. Vu premium Smart TV च्या २०२३ एडिशनला स्वच्छ फोटोसाठी ए प्लस ग्रेड ४०० निट्सचे ब्राइटनेस सोबत आयपीएस पॅनेल सारख्या फीचर्स सोबत आणले गेले आहे.

Vu premium Smart TV 2023 edition ची किंमत
Vu प्रीमियम स्मार्ट टीव्हीच्या लेटेस्ट मॉडलला २३ हजार रुपयाच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. ४३ इंचाचा प्रीमियम टीव्ही फक्त २३ हजार ९९९ रुपये किंमतीत उपलब्ध करण्यात येणार आहे. तर ५५ इंचाचा स्मार्ट टीव्हीची किंमत फक्त ३२ हजार ९९९ रुपये ठेवली आहे. या टीव्हीला देशातील सर्व रिटेल स्टोर्सशिवाय, अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि Vutvs.com वरून खरेदी करण्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

वाचाः अदानी वीज कार्यालयातून बोलतोय, असं सांगून महिलेच्या खात्यातून ६.९ लाख लंपास

Vu premium Smart TV 2023 edition चे फीचर्स
Vu प्रीमियम स्मार्ट टीव्हीला दोन साइज ऑप्शन मध्ये आणले गेले आहे. यात ४३ इंच आणि ५५ इंचाचा आयपीएस पॅनेल मिळतो. कंपनीच्या माहितीनुसार, टीव्हीला ए प्लस ग्रेडचा ४०० निट्सची ब्राइटनेस मिळते. या टीव्हीत डॉल्बी ऑडियो सोबत ५० वॉटचे बिल्ट इन साउंडबार दिले आहे. यावरून कंपनीचा दावा आहे की, यूजर्सला यासोबत जबरदस्त आवाजाचा एक्सपीरियन्स मिळेल. त्यामुळे टीव्ही सोबत अतिरिक्त स्पीकर जोडण्याची गरज नाही. टीव्हीत नवीन गुगल टीव्ही ऑपरेटिंग सिस्टम दिली आहे. रिमोटमध्ये व्हाइस असिस्टेंटची सुविधा दिली आहे. म्हणजेच तुम्ही आवाजाने टीव्ही कंट्रोल करू शकता.

वाचाः ४ एप्रिलला येतोय वनप्लसचा खास स्मार्टफोन, सोबत OnePlus Nord Buds 2 येणार

वाचाः ३१ मार्चपासून IPL ला सुरुवात, क्रिकेट चाहत्यांसाठी Jio ने आणले ३ नवीन प्लान, पाहा डिटेल्स

Source link

Vu premium Smart TVVu premium Smart TV 2023Vu premium Smart TV 2023 editionVu premium Smart TV pricevu premium smart tvsस्मार्ट टीव्हीस्वस्त स्मार्ट टीव्ही
Comments (0)
Add Comment