IGNOU Job: बारावी उत्तीर्णांना इग्नूमध्ये नोकरी करण्याची संधी, ६३ हजारपर्यंत मिळेल पगार

IGNOU Job 2023: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency, NTA) ने इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (IGNOU) तील भरती संदर्भात अपडेट दिली आहे. या भरती अंतर्गत २०० ज्युनिअर असिस्टंट टायपिस्ट(JAT) पदांसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

इग्नूने कनिष्ठ सहाय्यक-सह-टंकलेखक पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट recruitment.nta.nic.in वर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करु शकतात.

अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच इंग्रजीमध्ये ४० शब्द प्रति मिनिट आणि हिंदीमध्ये ३५ शब्द प्रतिमिनीट इतका टायपिंग स्पीड असणे आवश्यक आहे.

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

२२ मार्चपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून २० एप्रिल २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी आपले अर्ज या तारखेपुर्वी पाठवायचे आहेत.

पदभरतीचा तपशील जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

Source link

IGNOU JobIGNOU Job 2023IGNOU RecruitmentIndira Gandhi National Open UniveristyJob For HSCJunior Assistant Postइग्नूमध्ये नोकरीबारावी उत्तीर्णांना नोकरी
Comments (0)
Add Comment