wheels of the moving bus came off: मोठा अनर्थ टळला! चालत्या बसची चाके निखळली; चालकाने दाखवले प्रसंगावधान

हायलाइट्स:

  • हैदराबादहून देगलूरला (जि. नांदेड) येणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बसची दोन चाके निखळली.
  • मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला.
  • मात्र मध्यरात्री तीनवाजता हा प्रकार घडूनही परिवहन मंडळाची मदत पहाटे पाच वाजता पोचली.

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हैदराबादहून देगलूरला (जि. नांदेड) येणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बसची दोन चाके निखळली. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. मात्र मध्यरात्री तीन वाजता हा प्रकार घडूनही परिवहन मंडळाची मदत पहाटे पाच वाजता पोचली. तोवर प्रवासी चालक, वाहक बसमध्येच बसून होते. (the wheels of the moving bus came off the alertness of driver averted the disaster)

सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की देगलूर आगाराची बस (क्रमांक एम एच ०९ एफ एल १०५९) गुरुवारी रात्री अकरा वाजता हैदराबादहून निघाली. बसमध्ये प्रवासी संख्या कमी होती. रात्री तीनच्या सुमारास बस देगलूरपासून दहा किलोमीटर असलेल्या बिचकुंदाजवळ आली. बिचकुंदा ते मेनूर दरम्यान चालत्या बसची मागच्या बाजूची दोन चाके निखळली. चालकाने प्रसंगावधान राखून बसला नियंत्रणात आणले. त्यामुळे अनर्थ टळला.

क्लिक करा आणि वाचा- अनपेक्षित! लग्नातल्या सत्कारासाठी नाव पुकारलं आणि लागला मूळ गावाचा शोध

रात्री तीनची वेळ रस्त्यावर बस बंद पडली. तातडीने देगलूर आगाराला संपर्क साधून मदत मागण्यात आली. पण सकाळी पाच वाजता आगारातील मेकॅनिक घटनास्थळी पोचले, दुरुस्ती केली. त्यानंतर बस देगलूरला पोचली.

क्लिक करा आणि वाचा- केंद्राच्या व्हॅक्सिन डिप्लोमसीचा राज्यांना फटका; डॉ.नीलम गोऱ्हे यांचा मोदी सरकारवर निशाणा
क्लिक करा आणि वाचा- पन्हाळ्यात भीषण अपघात; कार थेट दरीत कोसळली, दोन युवक ठार

Source link

alertness of driver averted the disasterwheels of the moving bus came offचालत्या बसची चाके निखळलीमोठा अनर्थ टळलासंभाव्य अपघात टळला
Comments (0)
Add Comment