अदानी वीज कार्यालयातून बोलतोय, असं सांगून महिलेच्या खात्यातून ६.९ लाख लंपास

नवी दिल्लीः सोशल मीडिया आणि डिजिटल पेमेंटचा वापर वाढल्याने आता सायबर फ्रॉड आणि ऑनलाइन स्कॅम सुद्धा वाढले आहेत. कधी फ्री गिफ्टच्या नावावर तर कधी 5G नेटवर्क सुरू करण्याच्या नावाखाली स्कॅमर्स अनेक लोकांना चुना लावण्याचं काम करीत आहेत. अनेक जण पुरेसी माहिती नसल्याने याला बळी पडत आहेत. आपल्या आयुष्याची कमाई एका झटक्यात गमवण्याची वेळ अनेकांवर येत आहे. असेच एक प्रकरण मुंबईत उघडकीस आले आहे. मुंबईतील एका महिलेला फेस वीज बिल भरायचे सांगून सायबर फ्रॉड केला आहे. या महिलेच्या खात्यातून तब्बल ६.९ लाख रुपयाचा स्कॅम करण्यात आला आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.

मुंबईतील ६५ वर्षीय महिलेला तब्बल ६ लाख ९१ हजार ८५९ रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. तुम्ही विजेचे बिल भरले नाही, असा फेक मेसेज पाठवून या महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. मुंबईतील अंधेरी भागात राहणाऱ्या या महिलेच्या पतीच्या फोनवर एक मेसेज आला होता. या मेसेज मध्ये लिहिले होते की, विजेचे बिल भरले नाही. जर बिल भरले नाही तर वीज कनेक्शन कट केले जाईल. मेसेज मध्ये एक फोन नंबर सुद्धा दिला होता. पीडित महिलेने दिलेल्या नंबरवर कॉल केला. यानंतर समोरील व्यक्तीने महिलेचा कॉल घेत स्वतःला अदानी वीज कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितले. तसेच तुम्हाला मदत करतो असे सांगून ‘टीम व्यूअर क्विक सपोर्ट’ हे अॅप डाउनलोड करण्यास सांगितले.

वाचाः ३१ मार्चपासून IPL ला सुरुवात, क्रिकेट चाहत्यांसाठी Jio ने आणले ३ नवीन प्लान, पाहा डिटेल्स

‘टीम व्यूअर क्विक सपोर्ट’ हे अॅप डाउनलोड केल्यानंतर थोड्याच वेळात महिलेच्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर झाल्याचे तीन मेसेज आले. महिलेच्या खात्यातून ४ लाख ६२ हजार ९५९ रुपये, १ लाख ३९ हजार ९०० रुपये आणि ८९ हजार रुपये असे कट झाल्याचे तीन मेसेज आले होते. स्कॅमर्सने महिलेच्या खात्यातून एकूण ६ लाख ९१ हजार ८५९ रुपये लंपास केले आहे. एसबीआय फ्रॉड मॅनेजमेंट टीमने महिलेशी संपर्क केला. तसेच नुकत्याच झालेल्या ट्रान्झॅक्शन संबंधी विचारले असता आपण कोणतेच पैसे ट्रान्सफर केले नाही, असे महिलेने सांगितले. यानंतर महिलेनी आपल्या मुलीला घेवून अंधेरी पोलीस ठाण्यात प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचाः मस्तच! आता डेस्कटॉपवरून करा WhatsApp व्हिडिओ आणि ऑडियो कॉल, पाहा डिटेल्स

Source link

Online Scamonline scam alertonline scam awarenessonline scam in indiaOnline Scam in mumbaionline scam with honey trap
Comments (0)
Add Comment