३१ मार्चपासून IPL ला सुरुवात, क्रिकेट चाहत्यांसाठी Jio ने आणले ३ नवीन प्लान, पाहा डिटेल्स

नवी दिल्लीः Reliance Jio ने क्रिकेट चाहत्यांसाठी तीन नवीन प्रीपेड रिचार्ज प्लान लाँच केले आहेत. ३१ मार्च २०२३ पासून IPL 2023 ला सुरुवात होत आहे. जिओ सिनेमावर आयपीएल लाइव्ह स्ट्रिम करणार आहे. त्यामुळे जिओने जास्त डेटाचे ३ प्लान आणले आहेत. जिओ आपल्या नवीन प्लान्स सोबत ४० जीबी पर्यंत डेटा फ्री देत आहे. त्यामुळे क्रिकेट चाहते डेटाच्या चिंता विना आयपीएल सामना पाहू शकतील. आयपीएल २०२३ चा पहिला सामना या महिन्याच्या अखेरच्या दिवशी होणार आहे. रिलायन्स जिओने यूजर्ससाठी तीन नवीन डेटा अॅड ऑन पॅकची सुद्धा घोषणा केली आहे. जाणून घ्या या तिन्ही प्लानसंबंधी.

जिओचा ९९९ रुपयाचा प्रीपेड प्लान
जिओचा ९९९ रुपयाच्या प्रीपेड प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. याशिवाय, जिओ यूजर्सला २४१ रुपयाचे व्हाउचर फ्री मिळते. ज्यात ४० जीबी डेटाचा समावेश आहे. या प्लानची वैधता ८४ दिवसाची आहे.

जिओचा ३९९ रुपयाचा प्लान

जिओचा ३९९ रुपयाचा प्लानमध्ये २८ दिवसाची वैाधता मिळते. ज्यात रोज ३ जीबी डेटाचा समावेश आहे. या प्लानमध्ये ६१ रुपयाचे फ्री व्हाउचर मिळते. तुम्हाला या प्लानमध्ये ६ जीबी अतिरिक्त डेटा मिळतो. प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.

वाचाः सेलमध्ये मोठ्या डिस्काउंट सोबत खरेदी केलेला फोन असू शकतो फेक, असं ओळखा, पाहा टिप्स

जिओचा २१९ रुपयाचा प्रीपेड प्लान
जिओचा २१९ रुपयाचा प्लान मध्ये १४ दिवसाची वैधता मिळते. ज्यात रोज ३ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय, जिओ यूजर्सला २ जीबी फ्री डेटा दिला जातो.

वाचाः PAN Card चा नंबर विचारून रिकामे होवू शकते बँक अकाउंट, चुकूनही करू नका या चुका

जिओचा क्रिकेट डेटा अॅड ऑन प्लान लाँच
कंपनीने तीन नवीन डेटा अॅड ऑन प्लानची घोषणा केली आहे. २२२ रुपयाचा डेटा अॅड ऑन पॅक ५० जीबी डेटा देतो. तसेच सध्याच्या प्रीपेड प्लान पर्यंत वैधता मिळते. ४४४ रुपयाच्या जिओ प्रीपेड प्लानमध्ये ६० दिवसाची वैधता मिळते. सोबत १०० जीबी डेटाचा समावेश आहे.

वाचाः Airtel चा ५९९ रुपयाचा प्लान लाँच, Jio चे टेन्शन वाढले, १०० जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग फ्री

Source link

ipl 2023 newsipl 2023 start dateipl newsreliance jio planreliance jio plansreliance jio plans price
Comments (0)
Add Comment