Airtel चा ५९९ रुपयाचा प्लान लाँच, Jio चे टेन्शन वाढले, १०० जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग फ्री

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी एअरटेलकडून आणखी एक नवीन प्लान लाँच करण्यात आला आहे. हा एक फॅमिली प्लान आहे. जो ५९९ रुपये किंमतीत येतो. या प्लानला जिओच्या फॅमिली प्लानला टक्कर देण्यासाठी आणले आहे. या प्लानमध्ये एक अॅड ऑन प्लान ऑफर केला जात आहे. तर प्लॅटिनम ऑफर मध्ये दोन कनेक्शन दिले जात आहेत. यासाठी यूजर्सला २९९ प्रति महिना एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागत आहे.

एअरटेलचा ५९९ रुपयाचा प्लॅटिनम प्लान
या प्लानमध्ये ग्राहकांना १ प्रायमरी कनेक्शन दिले जात आहे. तर नो कॉस्ट चार्जवर एक अॅड ऑन प्लान दिला जात आहे. या प्रमाणे ग्राहक मंथली ५९९ रेंटलवर दोन कनेक्शन अॅड करू शकाल. जर डेटा बेनिफिट्समध्ये एअरटेल ५९९ रुपयाच्या प्लानमध्ये एकूण ७५ जीबी डेटा दिला जातो. सोबत ३० जीबी एक्स्ट्रा डेटा दिला जातो. या प्रमाणे या प्लानमध्ये एकूण १०० जीबी डेटा दिला जातो. सोबत या प्लानमध्ये २०० जीबी डेटा रोलओव्हरची सुविधा मिळते. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंगची सुविधा दिली जाते. या प्लानमध्ये डेली १०० एसएमएसची सुविधा मिळते. या पोस्टपेड प्लानमध्ये अनलिमिटेड ५जी डेटा दिला जातो.

वाचाः PAN Card चा नंबर विचारून रिकामे होवू शकते बँक अकाउंट, चुकूनही करू नका या चुका

मिळतील या शानदार ऑफर

एअरटेलचा ५९९ रुपयाचा प्लॅटिनम प्लानमध्ये १२ महिने नो कॉस्ट ऑफर दिली जाईल. यासाठी वेगळी एक्स्ट्रा कॉस्ट दिली जात आहे. एअरटेलचा ५९९ रुपयाचा प्लॅटिनम प्लानमध्ये ६ महिन्यासाठी अमेझॉन प्राइम मेंबरशीप आणि एक वर्षासाठी Disney+ Hotstar मोबाइल सब्सक्रिप्शन दिले जात आहे. सोबत एक्सट्रीम पॅक आणि Wynk प्रीमियम बेनिफिटस दिले जात आहे.

वाचाः आता ट्रेन तिकिट रद्द केल्यावर मिळणार १०० टक्के रिटर्न, पाहा डिटेल्स

जिओचा ५९९ रुपयाचा रिचार्ज प्लान
जिओचा ५९९ रुपयाच्या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग सोबत अनलिमिटेड डेटा दिला जात आहे. सोबत डेली १०० एसएमएस दिले जात आहे. यात जिओ अॅप्स सोबत जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जात आहे. जिओच्या या प्लानमध्ये जिओ वेलकम ऑफर दिली जात आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड 5G डेटा दिला जात आहे.

वाचाः iPhone 14 वर बंपर ऑफर, ३५ हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी

Source link

Airtel family PlanAirtel family Plan under 600airtel family plansAirtel PlanAirtel Plan vs jioairtel plans in indiaएअरटेल प्लान
Comments (0)
Add Comment