१. श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
जय जय सद्-गुरु स्वामी समर्था,
आरती करु गुरुवर्या रे।
अगाध महिमा तव चरणांचा,
वर्णाया मति दे यारे॥धृ॥
अक्कलकोटी वास करुनिया,
दाविली अघटित चर्या रे।
लीलापाशे बध्द करुनिया,
तोडिले भवभया रे॥१॥
यवन पूछिले स्वामी कहाॅ है,
अक्कलकोटी पहा रे।
समाधी सुख ते भोगुन बोले,
धन्य स्वामीवर्या रे॥२॥
जाणिसे मनीचे सर्व समर्था,
विनवू किती भव हरा रे।
इतुके देई दीनदयाळा,
नच तव पद अंतरा रे॥३॥
२. श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !!
जयदेव जयदेव..!!
छेली खेडेग्रामी तू अवतरलासी,
जगदुध्दारासाठी राया तू फिरसी
भक्त वत्सल खरा तू एक होसी,
म्हणूनी शरण आलो तुझिया चरणांसी !!
जयदेव जयदेव..!!
त्रैगुण परब्रम्ह तुझा अवतार,
याची काय वर्णू लीला पामर
शेषादीक शिणले नलगे त्या पार,
तेथे जडमूढ कैसा करु विस्तार !!
जयदेव जयदेव..!!
देवाधिदेव तू स्वामीराया,
निर्जर मूनिजन ध्याती भावे तव पाया
तुजसी अर्पण केली आपली ही काया,
शरणागता तारी तू स्वामीराया !!
जयदेव जयदेव..!!
अघटित लीला करुनी जडमूढ उध्दरीले,
किर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे.
चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले,
तुझ्या सूता नलगे चरणावेगळे !!
जयदेव जयदेव..!!
३. श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
आरती ओवाळू श्री सदगुरू स्वामी समर्था |
स्वरूप दिगंबर आजानुबाहु भव्यकाय नाथा – दिव्यकाय नाथा || धृ.||
हृदय निरांजनी शुद्ध प्रेमधृति भवाच्या वाती |
भजनानंद प्रकाश देउनी उजळल्या ज्योती || १ ||
सर्वस्वापर्ण नैवधाशी ठेविलेचि पुढती |
सन्मति, सदधृति, सतकृती सदगति प्रसाद धा हाती || २ ||
४. श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना
|| सदगुरु नाथा हात जोडीतो प्रार्थना ||
सदगुरु नाथा हात जोडीतो अंत नको पाहु।
ऊकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू॥धृ०॥
निशीदिनी श्रमसी मम हितार्थ तू किती तुज शीण देऊ।
ह्रदयी वससी परी नच दिससी कैसे तुज पाहु॥१॥
उत्तीर्ण नव्हे तुज उपकारा जरी तनु तुज वाहू।
बोधुनि दाविसी इहपर नश्वर मनी उठला बाऊ॥२॥
कोण कुठील मी कवण कार्य मम जनी कैसा राहू।
करी मज ऐसा निर्भय निश्चल सम सकला पाहू॥३॥
अजाण हतबल भ्रमीत मनिची तळमळ कशी साहू।
निरसूनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू॥४॥