Daily Panchang In Marathi: रविवार २६ मार्च २०२३, भारतीय सौर ५ चैत्र शके १९४५, चैत्र शुक्ल पंचमी सायं. ४-३२ पर्यंत, चंद्रनक्षत्र: कृत्तिका दुपारी २-०० पर्यंत, चंद्रराशी: वृषभ, सूर्यनक्षत्र: उत्तरा भाद्रपदा,
प्रीति योग रात्री ११ वाजून ३२ मिनिटापर्यंत त्यानंतर आयुष्मान योग प्रारंभ. बालव करण सायं ४ वाजून ३३ मिनिटापर्यंत त्यानंतर तैतिल करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र वृषभ राशीत प्रवेश करेल.
सूर्योदय:
सकाळी ६-३९,
सूर्यास्त:
सायं. ६-५०,
चंद्रोदय:
सकाळी ९-५०,
चंद्रास्त:
रात्री ११-२७,
पूर्ण भरती:
पहाटे २-२३ पाण्याची उंची ४.०९ मीटर, दुपारी ३-२५ पाण्याची उंची ४.१५ मीटर,
पूर्ण ओहोटी:
सकाळी ८-२८ पाण्याची उंची ०.६२ मीटर, रात्री ९-०३ पाण्याची उंची १.९० मीटर.
दिनविशेष:
श्रीपंचमी, लक्ष्मी पंचमी.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून २ मिनिटे ते १२ वाजून ५२ मिनिटापर्यंत राहील. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून १९ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजून ३ मिनिटे ते १२ वाजून ५० मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून ३४ मिनिटे ते ६ वाजून ५८ मिनिटापर्यंत. अमृत काळ सकाळी ११ वाजून ३३ मिनिटे ते दुपारी १ वाजून १२ मिनिटापर्यंत राहील. रवी योग दुपारी २ वाजून १ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून १८ मिनिटापर्यंत राहील.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सायं ४ वाजून ३० मिनिटे ते ६ वाजेपर्यंत. दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुपारी ३ वाजून ३० मिनिटे ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सायं ४ वाजून ५७ मिनिटे ते ५ वाजून ४६ मिनिटापर्यंत राहील.
आजचा उपाय :
चैत्र नवरात्रीचा पांचवा दिवस स्कंदमाताची पूजा करा आणि मुलांना मिठाई द्या. मंदिरात अन्न दान करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)