Airtel 5G : जे जिओला जमलं नाही ते एअरटेलनं करून दाखवलं

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने वेगाने आपली ५जी इंटरनेट सर्विसचा विस्तार केला आहे. या लिस्टमध्ये कंपनीने शुक्रवारी आणखी २३५ नवीन शहरात आपली अल्ट्रा फास्ट ५जी सर्विस Airtel 5G Plus च्या सुरुवातीची घोषणा केली आहे. नवीन शहरा सोबत Airtel 5G Plus सर्विस आता ५०० शहरात पोहोचली आहे. तर एअरटेल देशात ५०० शहरात ५जी इंटरनेट सर्विस रोलआउट करणारी पहिली टेलिकॉम कंपनी बनली आहे.

५०० शहरात पोहोचली एअरटेल ५जी सर्विस
भारती एअरटेल अल्ट्रा फास्ट ५जी सेवा देशातील ५०० शहरातील ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. कंपनीने आपल्या नेटवर्कमध्ये २३५ नवीन शहराला जोडले आहे.

भारती एअरटेलचे सीटीओ रणदीप सेखों यांनी या लाँचिंग वेळी म्हटले की, ऑक्टोब २०२२ मध्ये एअरटेल ५जी सेवा कंपनीने सुरू केली होती. आज मेगा लाँच देशाच्या प्रत्येक एअरटेल ग्राहकांना अल्ट्रा एअरटेल ५जी प्लस जोडण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही सर्वात आधी ५०० शहरात सर्विस देणारे पहिले बनलो आहेत. तसेच रोज ३० ते ४० शहरे जोडत आहोत. सप्टेंबर २०२३ पर्यंत आम्ही संपूर्ण शहरात ५जी फुटप्रिंटचा विस्तार करण्याचे ठरवले आहे.

मार्च २०२४ पर्यंत संपूर्ण देशात Airtel 5G Plus
कंपनीने नुकतेच म्हटले की, आमची ५जी रोलआउट मार्च २०२४ पर्यंत देशातील संपूर्ण गावे आणि शहरांपर्यंत सेवा विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. एअरटेल ५जी प्लस सेवेच्या उपलब्धा वेगाने विस्तार केला जात आहे. ज्यात देशातील ग्रामीण भाग आणि शहरांचा समावेश केला जाईल.

वाचाः रोजचा खर्च फक्त २.८० रुपये, ७० दिवसाची वैधता, रोज २ जीबी डेटा आणि फ्री कॉलिंग

४०६ शहरात पोहोचले जिओ ५जी नेटवर्क
रिलायन्स जिओने तीन दिवसांआधी एकाचवेळी ४१ शहरात आपली हाय स्पीड इंटरनेट सर्विस पोहोचवली आहे. देशातील ४०६ शहरात जिओचे ५जी नेटवर्क पोहोचवले आहे. ज्यात कंपनी आपली ट्रू ५जीचा विस्तार करीत आहे.

वाचाः 6G साठी PM मोदींचं ‘मिशन’ ठरलं; जपान, कोरिया आणि अमेरिकेच्या रांगेत भारत

Source link

airtel 5gairtel 5g latest newsairtel 5g latest updateairtel 5g networkairtel 5g plansAirtel 5G Plusairtel 5g service
Comments (0)
Add Comment