नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने ग्राहकांच्या सुविधेसाठी अनेक रिचार्ज प्लान उपलब्ध केले आहेत. या रिचार्ज प्लानमध्ये रोज १ जीबी डेटा पासून रोज ३ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळते. सोबत एअरटेलने अनेक शानदार फॅमिल प्लान सुद्धा उपलब्ध केले आहेत. ज्यात एका रिचार्जमध्ये संपूर्ण कुटुंबाला अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेटचा वापर करता येवू शकणार आहे. या प्लानची किंमत १ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या प्लान सोबत १९० जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच या प्लानमध्ये डिज्नी प्लस हॉटस्टार आणि अमेझॉन प्राइमचे सब्सक्रिप्शन मिळते.
एअरटेलचा ९९९ रुपयाचा पोस्टपेड प्लान आहे. या प्लान सोबत यूजर आपल्या ३ लोकांना जोडू शकतो. या प्लान सोबत १९० जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. प्लान सोबत प्रायमरी यूजर्सला १०० जीबी डेटा मिळतो. अन्य तीन यूजर्सला ३० जीबी डेटा मिळतो. म्हणजेच प्लान सोबत एकूण १९० जीबी डेटा मिळतो. सोबत २०० जीबी डेटा रोलओव्हरची सुविधा दिली जाते. प्लानमध्ये १०० एसएमएस रोज मिळते. प्लानची वैधता ३० दिवसाची मिळते. म्हणजेच तुम्हाला २४९ रुपये प्रति महिना खर्चात महिनाभर टेलिकॉम सेवेचा लाभ मिळतो.

वाचाः 6G साठी PM मोदींचं ‘मिशन’ ठरलं; जपान, कोरिया आणि अमेरिकेच्या रांगेत भारत
एक प्लान मध्ये ९ कनेक्शन
एअरटेलच्या या प्लान सोबत यूजर्सला एकाचवेळी ९ कनेक्शन घेता येवू शकतात. यूजर्सला यासटी प्रत्येक कनेक्शनला अॅड करण्यासाठी २९९ रुपये चार्ज द्यावा लागतो.
वाचाः मस्तच! आता डेस्कटॉपवरून करा WhatsApp व्हिडिओ आणि ऑडियो कॉल, पाहा डिटेल्स
प्लानमध्ये मिळेल ही सुविधा
एअरटेलच्या ९९९ रुपयाच्या पोस्टपेड प्लान सोबत ओटीटी सब्सक्रिप्शन सुद्धा मिळते. प्लानमध्ये विना अतिरिक्त शुल्क ६ महिन्यासाठी अमेझॉन प्राइम मेंबर आणि एक वर्षासाठी डिज्नी प्लस हॉटस्टारचे मोबाइल सब्सक्रिप्शन मिळते. तसेच या प्लानमध्ये मोबाइल प्रोटेक्शन, Xstream मोबाइल पॅक आणि Wynk प्रीमियम म्यूझिक चे सब्सक्रिप्शन मिळते.
वाचाः Airtel 5G : जे जिओला जमलं नाही ते एअरटेलनं करून दाखवलं