HSC Paper Leaked: बारावी पेपरफुटी प्रकरणात एसआयटी अहवालाची प्रतीक्षा

अमोल सराफ, बुलढाणा

बुलढाणा बारावी पेपरफूटी प्रकरणात एसआयटीच्या अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. आरोपींच्या मोबाईलच्या फोरेन्सिक अहवालानंतर तपासातील बारकावे उलगडणार आहेl. यानंतर शिक्षण मंडळ काय निर्णय घेणार ? याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष आहे. हा अहवाल ३१ मार्चपर्यंत एसपीकडे अहवाल सादर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील गणिताचा बारावी पेपरफूटी प्रकरण राज्यभरात गाजले. या प्रकरणात पोलीस विभागाने विशेष चौकशी पथक नेमले होते. यात आठ आरोपींना अटक झाली मात्र एसआयटीचा अहवालाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे.

आरोपींच्या मोबाईलचा फोरेन्सिक अहवाल आल्यानंतर तपासातील बारकावे उलघडणार आहे .विद्यार्थ्यांचे भविष्य ठरणाऱ्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडाव्यात यासाठी शासन प्रयत्न करत असते. मात्र सिनखेडराजा येथील प्रकरणाने यंत्रणेतील त्रुटी समोर आल्या आहेत.

परीक्षा सुरू होण्यापूर्वीच सिनखेडराजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून तीन मार्च रोजी बारावीचा गणिताचा पेपर फुटला. दरम्यान शिक्षण विभागाच्या वतीने शिंदखेडराजा येथे तक्रार देण्यात आली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण साकारखेडा पोलीस ठाणे अंतर्गत असल्याने तिथे वर्ग करण्यात आले.

पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार नंदकिशोर काळे यांनी तपास सूत्र हलविले. या प्रकरणाची व्याप्ती पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाज यांनी ६ मार्च रोजी विशेष पोलीस चौकशीसाठी नेमले होते. यामध्ये पोलीस अधिकारी विलास यामावार हे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. त्यांना तपासकामी मदतीकरता लोणारचे सह पोलीस निरीक्षक शरद आहेर, देऊळगाव राजा पोलीस उपनिरीक्षक किरण खाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल निवृत्ती पोफळे, पवन मखमले सायबर पोस्ट बुलढाणा, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप सौभाग्य ,साखरखेर्डा अनिल शिंदे, लोणार,या सहा जणांची नेमणूक करण्यात आली आहे.

सुरुवातीला पाच नंतर दोन आणि पाठोपाठ एक असे आठ आरोपी या प्रकरणी अटक करण्यात आले. यातील संशयित चार शिक्षकांना निलंबीत करण्यात आले तर तीन आरोपींना जामीन मंजूर झाला आहे.

लोणार येथील जाकीर हुसेन उर्दू शाळेमधील प्राचार्य अब्दुल अखिल अब्दुल मूनाफ हेच प्रमुख आरोपी असल्याचे तपासात पुढे आल्याचे सूत्राने सांगितले होते. मात्र या प्रकरणात नेमण्यात आलेल्या एसआयटीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. मुख्यत्व प्राचार्य अब्दुल अखिल अब्दुल मुणाफ यांच्या मोबाईलचे फॉरेन्सिक अहवाल येणे बाकी आहे. यातच समिती प्रमुख यामावर हे दरम्यानच्या काळात इतर प्रशासकीय कामासाठी गुंतले असल्याची माहिती आहे.

बारावी गणित पेपरफुटी प्रकरणात एसआयटीचा अहवाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात एसआयटी अहवाल जिल्हा परिषद अध्यक्ष सारंग आव्हाड यांच्याकडे सादर होऊ शकतो. त्यानंतर बोर्ड यावर काय निर्णय घेते? याकडे प्रामुख्याने विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Source link

12th paper Leaked caseHSC Paper LeakedMaharashtra TimesPaper LeakedSIT reportएसआयटी अहवालबारावी पेपरफूटी प्रकरण
Comments (0)
Add Comment