ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तरुणांना अनेक वर्षे लागतात. अशीच एक परीक्षा चीनमध्ये होत असून ती सर्वाधिक कठीण परीक्षा म्हणून ओळखली जाते.
गाओकाओ सारखी परीक्षा तर ९ तास चालते. पण याशिवाय जगात अशीही एक परीक्षा आहे, ज्यामध्ये उमेदवाराला दारूचा वास घेऊन ती किती जुनी आहे हे सांगावे लागते. हे ऐकून तुम्हाला थोडं अवघडल्यासारखं वाटेल. आपल्या देशात दारुला एका विशिष्ट नजरेने पाहिले जाते. त्यामुळे आपल्या देशात अशा परीक्षांना इतकं महत्व दिलं जात नाही. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, मागच्या ५० वर्षांच्या इतिहासात अवघ्या २७३ जण ही परीक्षा उत्तीर्ण करु शकले आहेत. मास्टर सोमेलियर डिप्लोमा परीक्षा असे या परीक्षेचे नाव आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.
वास्तविक वाइन व्यावसायिकांना सोमेलियर म्हणतात.जे बार आणि पॉश हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये काम करतात आणि दारूचे उत्तम मिश्रण तयार करतात. वाइनसोबत काय खाल्ल्याने सर्वात जास्त आनंद मिळेल? हे यातून कळते. या सॉमेलियरच्या व्यावसायिक निवडीसाठी, मास्टर सोमेलियर डिप्लोमा परीक्षा सुरू झाली.
परीक्षा कशी आणि कधी सुरू झाली?
पहिली मास्टर सोमेलियर परीक्षा १९६९ मध्ये लंडनमध्ये झाली. पण वाईन प्रेमींनी १९७७ मध्ये एक संस्था स्थापन केली. ज्याचे नाव कोर्ट ऑफ मास्टर सोमेलियर होते. याद्वारे अल्कोहोलचे मिश्रण कसे तयार करावे? आणि त्याचा आनंद वाढवण्यासाठी त्यासोबत काय खावे? याचे प्रशिक्षण देण्यात आले. संस्थेचे स्वरूप आल्यानंतर ही परीक्षा शिस्तबद्ध पद्धतीने घेतली जाऊ लागली.
परीक्षा उत्तीर्ण होणे खूप कठीण
ही परीक्षा जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. त्यामुळे आजपर्यंत फार कमी परीक्षार्थी यामध्ये उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेत एकहीजण उत्तीर्ण झाला नाही अशीही वेळ अनेकदा आली आहे. त्यामुळे आजपर्यंत केवळ २७३ लोकांना मास्टर सोमेलियर ही पदवी देण्यात आली आहे.
परीक्षा कशी आहे?
ही परीक्षा ४ टप्प्यात घेतली जाते. ज्यामध्ये परिचयात्मक, प्रमाणित सॉमेलियर, प्रगत सॉमेलियर आणि मास्टर सोमेलियर टप्प्यांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात, रेस्टॉरंट उद्योगातील काही वर्षांचा अनुभव असणारे सहभागी होऊ शकतात. पहिला टप्पा पार केल्यानंतर दुसऱ्या टप्प्याची लेखी परीक्षा असते. त्यासोबतच वाईनचा वास, त्याची चव आणि तयार होण्याची वेळही सांगायची असते.
तिसरा आणि चौथा टप्पा परीक्षा
सुरुवातीच्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यात लेखी परीक्षा आणि वाइन टेस्टिंग यांचा समावेश होतो. जे ५ दिवस टिकते. त्याच वेळी, हॉटेल उद्योगात किमान १० वर्षांचा अनुभव असलेले लोकच शेवटच्या आणि सर्वात कठीण टप्प्यात सहभागी होऊ शकतात. यात जगभरातील वाइन, कॉकटेल इत्यादींशी संबंधित प्रश्न असतात आणि ही परीक्षाही वेगवेगळ्या भागांमध्ये तीन वर्षे चालते. आजपर्यंत पहिल्याच प्रयत्नात केवळ ९ जण पास होऊ शकले आहेत.