Twitter Update: पोल वोटिंगसाठी १५ एप्रिलपासून द्यावे लागतील पैसे, फ्री ब्लू टिकचे दिवसही संपले

नवी दिल्लीः गेल्या महिन्यात एका ट्विटला रिप्लाय करताना वोटिंगमध्ये सहभागी होण्यासाठी ब्लू टिक बंधनकारक असणार आहे. त्यावेळी अनेकांनी खिल्ली उडवली होती. परंतु, आता एलन मस्क यांनी अधिकृतपणे तारखेची घोषणा केली आहे. एलन मस्क यांनी ट्विट करून म्हटले की, याची सुरुवात १५ एप्रिल पासून केली जाणार आहे. १५ एप्रिल पासून केवळ व्हेरिफाइड अकाउंटचे यूजर्स ट्विटर पोल मध्ये वोटिंग करू शकतील. यूजर्सची टाइमलाइनवर पोलचे पोस्ट पाहू शकतील. एलन मस्कच्या माहितीनुसार, AI बॉटचे वोटिंग सुद्धा कामी येईल. पोल आणि वोटिंगला व्हेरिफाइड अकाउंट पर्यंत मर्यादित करण्याचा अर्थ तुम्हाला पोलमध्ये सहभागी होण्यासाटी पैसे द्यावे लागतील. कारण, एलन मस्क यांनी म्हटले की, १ एप्रिल पासून सर्व लिगेसी ब्लू टिक (फ्री चे ब्लू टिक) हटवले जाणार आहेत. म्हणजेच आता फ्री मध्ये ब्लू टिक मिळणार नाही.

फ्री ब्लू टिकचे दिवस संपले, १ एप्रिल पासून हटवले जाणार सर्व Blue Tick
एलन मस्क फ्रीचे ब्लू टिकला हटवणार आहे. आधी ब्लू टिकच्या अकाउंट सोबत legacy verified चा टॅग आहे. ज्याला एलन मस्क पुढील आठवड्यापासून संपवणार आहे. म्हणजेच लिगेसी व्हेरिफाइड अकाउंट असतील. ब्लू टिकला हटवले जाईल. परंतु, हे फ्री ब्लू टिकवाले पैसे देवून ही सेवा घेवू शकतात. त्यानंतर त्यांचे ब्लू टिक कायम राहिल. परंतु, लिगेली व्हेरिफाइडचा टॅग हटवला जाईल. याची सुरुवाती १ एप्रिल २०२३ पासून केली जाणार आहे. लिगेसी व्हेरिफिकेशन अंतर्गत पत्रकार, मीडिया हाउस, सेलिब्रिटीज आदींना फ्री मध्ये ब्लू टिक दिली होती.

वाचाः जिओचा १९८ रुपयाचा प्लान लाँच, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, डेटा आणि १४ OTT Apps

किती आहे ट्विटर ब्लूची किंमत

भारतात Twitter blue च्या मोबाइल प्लानची किंमत ९०० रुपये आहे. वेब व्हर्जनसाठी ६५० रुपये शुल्क आकारले जाते. एलन मस्कने फ्रीचे अकाउंट वरून एसएमएस आधारित ट्रू फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) फीचरला हटवले आहे. आता एकूण काय तर जर तुम्हाला ट्विटर अकाउंटसाठी ब्लू टिक हवी असेल तसेच पोलमध्ये वोट करू पाहत असाल तर तुम्हाला दर महिन्याला कमीत कमी ६५० रुपये द्यावे लागतील.

वाचाः Jio-VI आणि Airtel चे हे प्लान IPL साठी बेस्ट, डेली डेटाची कोणतीही लिमिट नाही

Source link

elon musk twitter newstwitter blue ticktwitter blue tick pricetwitter blue tick price in indiatwitter blue tick price indiatwitter blue tick subscriptiontwitter blue tick subscription price
Comments (0)
Add Comment