Tanaji Sawant Education: आरोग्यमंत्री तानाजी सावंत कितवी शिकलेयत? जाणून घ्या

Tanaji sawant Education Details: आरोग्यमंत्री तानाजी सावंत नेहमीच आपल्या वेगवेगळ्या विधानांमुळे चर्चेत असतात. शिवसेनेत झालेले बंड हे देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानेच झाल्याचे विधान त्यांनी केले. यानंतर उलटसुलट राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काही महिन्यांपूर्वी ‘तुम्हाला मी अंगठाछाप मंत्री आहे असं वाटतं का? माध्यमांनी माझं शिक्षण बघावं, सोलापूरमध्ये शिक्षण झालं, त्यावेळेस मी टॉपचा विद्यार्थी होतो’, असं विधान आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलं होतं. दरम्यान आपण तानाजी सावंत यांच्या शिक्षणाविषयी जाणून घेऊया.

तानाजी सावंत हे सध्या भूम परांडा वाशी या विधासभा मतदार संघाचे आमदार आहेत. ते दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेना आमदार म्हणून निवडून आलेले तानाजी सावंत हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. ते अनेकदा आपल्या बोलण्यातून शिक्षणाचा दाखला देतात. यामागचे कारणही तसेच आहे.सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव या गावात शेतकरी कुटुंबामध्ये तानाजी सावंत यांचा जन्म झाला. शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. अनेक नेत्यांप्रमाणे केवळ राजकारणच न करता त्यांनी शिक्षण क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे.

तानाजी सावंत यांचा जन्म सोलापुरच्या माढा तालुक्यातील वाकाव येथे झाला. त्यांचे शिक्षण डी.ई.ई. बी.ई (इलेक्ट्रॉनिक्स), पी.जी.डी.एम. पी.एचडी इतके झाले आहे.

Chandrakant Patil Education: उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकात पाटील यांचे शिक्षण किती? जाणून घ्या
तानाजी सावंत यांनी कारखानदारी क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांनी पुणे येथए जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. तर उस्मानाबादच्या परांडा तालुक्यातील सोनारी येथे भैरवनाथ शुगर या खासगी साखर कारखान्याची उभारणी करीत त्यांचे मोठे योगदान आहे. सध्या भैरवनाथ शुगर कारखान्याचे सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात पाच युनिट सुरु आहेत.

आर्थिक परिस्थितीमुळे अर्धवट सोडले होते कॉलेज, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिक्षण किती? जाणून घ्या
तानाजी सावंत यांचे पत्रकारांना चॅलेंज

पुण्याच्या ससून रुग्णालयात औषधे वेळेवर मिळत नसल्याचा मुद्दा समोर आला होता. तेव्हा दौऱ्यात ‘हाफकीन’ या माणसाकडून औषधे घेऊच नका, असं राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हटल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं होतं. त्यावर काल सोलापूर दौऱ्यावर आलेल्या मंत्री सावंत यांना प्रश्न विचारल्यावर त्यांच्या चांगलाच पारा चढला. ‘हाफकीन कोण आहे?’ असा प्रश्न विचारताच ते पत्रकारांवर भडकले. “मी तसं काही बोललोच नाही. उगीचच माझ्या विरोधात माध्यमांनी बदनामी सुरू केली आहे. हाफकीन माणसाबद्दल बोललेलं दाखवा, मी ताबडतोब राजीनामा देतो”, असं चॅलेंज तानाजी सावंत यांनी दिलं. तसेच “तुम्हाला मी अंगठाछाप मंत्री आहे असं वाटतं का? माध्यमांनी माझं शिक्षण बघावं, सोलापूरमध्ये शिक्षण झालं, त्यावेळेस मी टॉपचा विद्यार्थी होतो”, असं सांगायला देखील सावंत विसरले नाहीत.

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना किती पगार मिळतो? जाणून घ्या…

Source link

health minister tanaji sawanttanaji sawant Controversytanaji sawant detailstanaji sawant EducationTanaji sawant Education Detailstanaji sawant phototanaji sawant Speechआरोग्यमंत्री तानाजी सावंततानाजी सावंत
Comments (0)
Add Comment