‘हे सरकार नाक दाबल्याशिवाय काहीच करत नाही का?’

हायलाइट्स:

  • राज्यातील शाळा सुरू करण्याचे संकेत, लोकलचाही निर्णय होणार
  • मंदिरांबद्दल सरकार मौन असल्यानं भाजप संतापला
  • हिंदूंवर अन्याय करणं हा यांचा किमान समान कार्यक्रम – नीतेश राणे

मुंबई: करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर राज्यातील बहुतेक जिल्ह्यांतील निर्बंध उठवण्यात आले आहेत. दुकानांच्या वेळा वाढवण्यात आल्या आहेत. शाळा आणि लोकल ट्रेन सुरू करण्याच्या निर्णयाप्रत सरकार आलं आहे. मात्र, धार्मिक स्थळं उघडण्याबाबत अद्याप कुठलंही आश्वासन देण्यात आलेलं नाही. त्यावरून भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. (BJP MLA Nitesh Rane attacks Maha Vikas Aghadi Over Restrictions on Temples)

मुंबईत लोकल ट्रेन सुरू करण्यासाठी सध्या भाजपनं आंदोलन सुरू केलं आहे. सर्वसामान्यांमध्ये लोकल बंद असल्यामुळं नाराजी वाढत आहे. शिक्षण मंडळानं केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणात बहुतेक पालकांनीही शाळा सुरू करण्यास पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळं लोकल आणि शाळा सुरू करण्याचा विचार सरकार गांभीर्यानं करत आहे. याच पार्श्वभूमीवर नीतेश राणे यांनी एक ट्वीट केलं आहे.

‘खेल रत्न’चे नामांतर: राष्ट्रवादीनं केलं मोदींची कोंडी करणारं ट्वीट

‘दोन दिवसांत लोकल चालू होणार, १७ ऑगस्ट पासून शाळा चालू होणार… मग कोविड लसीचे दोन डोस घेतलेल्यांना मंदिर दर्शन का नाही? हे सरकार नाक दाबल्याशिवाय काहीच करत नाही का?,’ असा सवाल नीतेश राणे यांनी केला आहे. ‘हिंदूंवर अन्याय करणं हा महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम झाला आहे,’ असा आरोपही नीतेश राणे यांनी केला आहे.
करोनाच्या पहिल्या लाटेनंतर राज्यात टप्प्याटप्प्यानं लॉकडाऊन उठवण्याची सुरुवात होताच भाजपनं मंदिरं उघडण्याची मागणी लावून धरली होती. त्यासाठी राज्यभरात घंटानाद आंदोलनही करण्यात आलं होतं. मात्र, राज्य सरकारनं खूप उशिरानं त्यावर निर्णय घेतला होता. करोनाची दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर भाजपनं पुन्हा तीच मागणी सुरू केली आहे. पंढरपूरच्या पायी वारीसाठी भाजपनं असाच आग्रह धरला होता. मात्र, सरकार झुकलं नाही. पायी वारीला परवानगी दिली गेली नाही. आता शाळा व लोकल सुरू करण्याचा विचार सरकारनं बोलून दाखवल्यानंतर भाजपनं पुन्हा धार्मिक स्थळं खुली करण्यासाठी दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे.

वाचा: कमलापूर कॅम्पमधील मृत हत्तीचे शवविच्छेदन रखडले; कारण ऐकून व्हाल अवाक्

Source link

bjp mla nitesh ranemaha vikas aghadiMaharashtra lockdown updatesMarathi Breaking NewsNitesh Rane Latest Tweetnitesh rane news in marathiNitesh Rane Slams Maha Vikas Aghadirestrictions on templesनीतेश राणेमहाविकास आघाडी
Comments (0)
Add Comment