Vastu Tips: श्रीराम नवमीला करा या गोष्टी; वास्तूदोष होईल दूर, लाभेल सुदृढ आरोग्य

भगवान श्री रामाची रामनवमीच्या दिवशी मनोभावे पूजा केल्याने इच्छित फळ प्राप्त होते असे सांगितले जाते. या दिवशी देशभरातील राम मंदिरांमध्ये भगवान श्री रामाची पूजा केली जाते आणि राम जन्मोत्सव साजरा केला जातो. गुरुवारी ३० मार्च रोजी, श्रीराम नवमीला काही खास योग जुळून येत आहे. गजकेसरी योग कसा तयार होतो? सुदृढ आरोग्य लाभण्यासाठी आणि वास्तू दोष दूर करण्यासाठी काय करावे, श्रीराम नवमीच्या दिवशी घरात कुठल्या गोष्टी आणल्यास शुभ फळ प्राप्त होते हे सविस्तर जाणून घेऊया.

गजकेसरी योग असा होतो तयार

गुरुवारी पुनर्वसु नक्षत्रासह यावेळी रामनवमीला गुरु पुष्य योग, अमृत सिद्धी योग, रवियोग, सर्वार्थ सिद्धी योग आणि गुरु योग यांचा संयोग साधला जात आहे. या संयोगाने भगवान राम, माता सीता आणि हनुमान यांची मनोभावे पूजा केल्याने कीर्ती, बल, बुद्धिमत्ता, ऐश्वर्य, प्रगती, परस्पर प्रेम, भौतिक सुखाचा विकास होतो. हत्ती आणि सिंह यांच्या संयोगाने गजकेसरी योग तयार होतो. हत्तीमध्ये गर्व नसलेली अफाट शक्ती आणि सिंहामध्ये अदम्य धैर्य आहे. त्याचप्रमाणे ज्याच्या कुंडलीत गजकेसरी योग उच्च स्थितीत असतो, तो आपली सर्व कार्ये आपल्या समंजसपणाच्या आणि अदम्य धैर्याच्या बळावर पूर्ण करतो.

या ५ गोष्टी खरेदी करा

या दिवशी पूजेच्या वस्तू, शुभ वस्तू, पिवळ्या वस्तू किंवा सोने खरेदी करा.
या दिवशी चांदीचा हत्ती खरेदी करून घरात स्थापित करा.
या दिवशी हनुमानजी किंवा श्री राम सीतेची मूर्तीही खरेदी करता येते.
या दिवशी तुम्ही घरासाठी सजावटीच्या वस्तूही खरेदी करू शकता.
या दिवशी वाहन, जमीन किंवा इमारत खरेदी करणे देखील शुभ असते.

आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी

रामनवमीच्या दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यात पूजा करावी. घराच्या पूर्वेला भिंतीवर सूर्योदयाचे म्हणजेच उगवत्या सूर्याचे किंवा सूर्यवंशी प्रभू श्री राम दरबाराचे चित्र लावावे. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढेल. तसेच आरोग्य देखील सुदृढ राहील.

या मंत्रामुळे होतील विघ्न दूर

वास्तुदोषामुळे तुमच्या घरात विघ्न येत असेल तर ते दूर करण्यासाठी रामनवमीच्या दिवशी एका पात्रात गंगाजल घेऊन पूर्वेकडे तोंड करून प्रभू श्री रामाच्या संरक्षण मंत्राचा ‘ॐ श्री ह्वी क्लीन रामचंद्राय श्री नमः सुमारे १०८ वेळा जप करा. यानंतर भांड्यात ठेवलेले पाणी घराभोवती शिंपडा, असे केल्याने तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होतात.

Source link

Ram Navami 2023remove vastu doshShri Ram NavamiVastu Tipsवास्तुशास्त्रवास्तूदोषश्रीराम नवमीश्रीराम नवमी 2023
Comments (0)
Add Comment