EPFO Job 2023: बारावी उत्तीर्णांना ईपीएफओमध्ये नोकरीची संधी

EPFO Job 2023: बारावी उत्तीर्ण आणि सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. एम्प्लॉई प्रॉविडंट फंड ऑर्गनायझेशनमध्ये २,८५९ पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया २७ मार्चपासून सुरू झाली. बारावी उत्तीर्ण आणि पदवीधर उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.

या भरती प्रक्रियेद्वारे ईपीएफओ मध्ये एकूण २,८५९ पदे भरली जाणार आहेत. यामध्ये सोशल सिक्योरिटी असिस्टंटची २,६७४ पदे आणि स्टेनोग्राफरच्या १८५ पदांचा समावेश आहे. या पदांसाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट epfindia.gov.inउमेदवारांना अर्ज करता येणार आहे. २६ एप्रिल २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

पात्रता

सोशल सिक्योरिटी असिस्टंट पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून पदवीध असावा. उमेदवाराने इंग्रजीमध्ये ३५ शब्द प्रति मिनिट आणि हिंदीमध्ये ३० शब्द प्रति मिनिट टाईपिंग वेग असावा.

स्टेनोग्राफर पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी उत्तीर्ण असावा. तसेच ८० शब्द प्रति मिनिट इतका टायपिंग स्पीड असावा.

वयोमर्यादा

पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २७ वर्षांदरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात सवलत देण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया

या पदांसाठी उमेदवारांची निवड कॉम्प्युटर आधारित लेखी चाचणी आणि कॉम्प्युटर टायपिंग चाचणीच्या आधारे केली जाईल. स्टेनोग्राफर पदांसाठी टायपिंग टेस्टऐवजी स्टेनो स्किल टेस्ट असेल.

पगार

लेव्हल ५ अंतर्गत सोशल सिक्योरिटी असिस्टंट पदासाठी २९ हजार २०० ते ९२ हजार ३०० रुपयांपर्यंत पगार दिला जाईल. लेव्हल ४ अंतर्गत स्टेनोग्राफरसाठी २५ हजार ५०० ते ८१ हजार १०० रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.

सोशल सिक्योरिटी असिस्टंट पदाचा तपशील जाणून घ्या

स्टेनोग्राफर पदाचा तपशील जाणून घ्या

Source link

Employees Provident Fund OrganisationEPFO Job 2023JobMaharashtra Timesrecruitmentईपीएफओमध्ये नोकरीबारावी उत्तीर्णांना नोकरी
Comments (0)
Add Comment