हायलाइट्स:
- भाजप- मनसेच्या संभाव्य युतीची चर्चा
- चंद्रकांत पाटलांनी घेतली होती राज ठाकरेंची भेट
- चंद्रकांत पाटील आज दिल्ली दौऱ्यावर
मुंबईः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. राज यांच्या कृण्णकुंज या निवासस्थानी उभय नेत्यांमध्ये शुक्रवारी ही बैठक झाली. या भेटीनंतर चंद्रकांत पाटील दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळं आगामी निवडणुकांमध्ये भाजप-मनसे युतीच्या चर्चेला बळ मिळालं आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे.
चंद्रकांत पाटील हे दिल्लीला दाखल झाले असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. त्यावेळी राज ठाकरेंच्या भेटीबाबात चर्चा करणार का?, असा सवाल विचारला असता त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट आणि दिल्ली दौऱ्याचा काहीही संबंध नाहीये. राज ठाकरेंच्या भेटीबाबतचा मी पंतप्रधान मोदी व अमित शहांना तपशील देणार आहे. मनसेसोबत युतीची बातचीत अजून प्राथमिक लेव्हलवर आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
तेजस ठाकरेंना व्हिव्हियन रिचर्डस् यांची उपमा; शिवसेना नेत्याच्या शुभेच्छांची चर्चा
दिल्लीचा दौरा हा १५ दिवस आधी ठरला होता. नव्या मंत्र्यांना भेटणे हा उद्देश आहे. महाराष्ट्रासंबंधी प्रश्न नवीन मंत्र्यांसमोर ठेवणार आहे. राज्यातील संघटनात्मक कामं यावर चर्चा होईल. येत्या सोमवारी पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवारदेखील दिल्लीत दाखल होणार आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या लोकल प्रवासात अडथळा; राज्य सरकारचे रेल्वेला पत्र
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्यासोबत भाजप नेते राम शिंदे, संजय कुटे, जयकुमार रावल आणि श्रीकांत भारतीय हे नेते उपस्थित आहे. सोमवारी भाजपची दिल्लीत बैठक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.