श्रीराम नवमीला या शुभेच्छांचा होईल उपयोग, वाचा आणि पाठवा

चैत्र शुद्ध नवमी हा दिवस हिंदू पंचागानुसार अत्यंत महत्वाचा दिवस. हा दिवस आपण मोठ्या आनंदाने व उत्साहाने रामनवमी म्हणून साजरा करतो. या तिथीला भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या जाणाऱ्या प्रभू रामचंद्राचा जन्म झाला होता. या दिवसाला ‘रामनवमी’ असे म्हणतात. यंदा ३० मार्च २०२३ रोजी रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात येईल. ज्याप्रमाणे कृष्णाचा जन्म रात्री १२ वाजता झाला असे म्हणतात तसेच प्रभू रामाचा जन्म सूर्य डोक्यावर आल्यावर म्हणजेच दुपारी १२ वाजता झाला. रामनवमी निमित्त शुभेच्छा पाठवण्यासाठी या संदेशांचा होईल उपयोग. वाचा, स्टेटस ठेवा आणि पाठवा.

Ram Navami 2023 Wishes in Marathi

“राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे गाव आहे..
असा हा रघुनंदन आम्हास
सदैव वंदनीय आहे.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..! “

“दशरथ नंदन राम
दया सागर राम
सत्यधर्म पारायण राम
राम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा..!”

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

“दुर्जनांचा नाश करुन
कुशल प्रशासनाचा
आदर्श प्रस्थापित
करणारे मर्यादा पुरुषोत्तम,
श्री रामचंद्र यांना वंदन,
श्री रामनवमीच्या शुभेच्छा!”

“छंद नाही रामाचा,
तो देह काय कामाचा,
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!”

श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

“चैत्र मात्र त्यात शुद्ध नवमी
ही तिथी गंथयुक्त तरिही,
वात उष्ण हे किती दोन प्रहरी,
का ग शिरी सूर्य थांबला,
राम जन्मला ग सखे राम जन्मला
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा”

“रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्।
नरो न लिप्यते पापै: भुक्तिं मुक्तिं च विंदति
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा”

श्रीराम नवमीच्या खूप खूप शुभेच्छा

“वाईटाचा त्याग कर,सत्याची कास धर
अरे मानवा जरा प्रभू रामांच्या विचाराची कास धर
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!”

“मुकुट शिरावर कटि पीतांबर,
वीर वेष तो श्याम मनोहर,
सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा..
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा”

Source link

Ram Navami 2023Ram Navami 2023 Wishes in MarathiRam Navami Wishesramnavami shubhechhaराम नवमीच्या शुभेच्छाश्रीराम नवमीश्रीराम नवमी 2023
Comments (0)
Add Comment