मुंबईः कस्तुरबा रुग्णालयात गॅसची गळती; कारण अद्याप अस्पष्ट

मुंबईः कस्तुरबा रुग्णालयात (kasturba hospital) एलपीजी गॅसची गळती झाल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. गॅसची गळती नेमकी कशामुळं झाली?, याबाबत अद्याप माहिती समोर आली नाहीये.

सकाळी ११च्या दरम्यान एलपीजी गॅसची गळती झाल्याचे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं. मात्र, ज्या ठिकाणी गॅसची गळती झाली आहे तिथे जास्त रुग्ण नव्हते. त्यामुळं मोठी दुर्घटना टळली आहे. या रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

वाचाः भाजप- मनसे युतीसाठी दिल्लीचा दौरा?; चंद्रकांत पाटील स्पष्टच बोलले

गॅस गळीती ही नेमकी कशामुळं झाली हे मात्र अद्याप कळलेलं नाही. डॉक्टर पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात एलपीजी गॅसची गळती झाल्याचे समजताच इमारतीतील सर्व रुग्णांना व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आहे. रुग्णांना बाजूच्या इमारतीत हलवण्यात आलं आहे. अग्निशमन दलाच्या जवान आपलं काम करत आहेत.

वाचाः क्रुरतेचा कळस; दारू पिण्यापासून अडवले, रागाच्या भरात जन्मदात्या आईची हत्या

Source link

Gas Leakgas leak at mumbai’s kasturba hospitalkasturba hospitalकस्तुरबा रुग्णालयगॅस गळती
Comments (0)
Add Comment