बीएसएनएलचा ५९९ रुपयाचा प्रीपेड रिचार्ज
बीएसएनएल ५९९ रुपयाचा प्रीपेड रिचार्ज, ग्राहकांना अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग, लोकल, एसटीडी आणि रोमिंग सह एमटीएनएल परिसरात सुद्धा रोज ३ जीबी हाय स्पीड डेटा आणि डेली १०० एसएमएसची सुविधा यात मिळेत. प्लानमध्ये संपूर्ण ८४ दिवसाची वैधता मिळते. म्हणजेच प्लानचा रोजचा खर्च फक्त ७ रुपये येतो.
वाचाः Samsung 43 Inch Smart TV खरेदी करा अर्ध्या किंमतीत, ऑर्डर करण्याआधी हा ऑप्शन निवडा
रात्री १२ ते सकाळी ५ पर्यंत अनलिमिटेड डेटा
डेली डेटा लिमिट संपल्यानंतर सुद्धा बीएसएनएल ग्राहक ईमेल आणि इंस्टेंट मेसेजिंग सारख्या इमरजन्सी कम्युनिकेशनसाठी ४० केबीपीएस स्पीड सोबत अनलिमिटेड डेटाचा आनंद घेता येवू शकतो. प्लानमध्ये ग्राहकांना रात्री १२ वाजेपासून सकाळी ५ पर्यंत अनलिमिटेड डेटा मिळतो. या दरम्यान वापरलेला डेटा प्लानमध्ये मिळणाऱ्या डेली डेटा लिमिटमधील नाही. त्यामुळे तुम्ही उशिरा रात्री पर्यंत जागरण करीत असाल तर तुम्ही रात्री अनलिमिटेड डेटाचा वापर करू शकता.
वाचाः मोठ्या डिस्काउंट सोबत iPhone 11 ला खरेदीची संधी, पाहा ऑफर्स डिटेल्स
अन्य बेनिफिट्स
डेटा, व्हाइस आणि एसएमएस बेनिफिट्स सोबत बीएसएनएलचा ५९९ रुपयाचा प्लान मध्ये ग्राहकांना बीएसएनएल ट्युन्स, झिंग म्युझिकचे सब्सक्रिप्शन मिळते. ८४ दिवसाच्या वैधतेच्या सेगमेंट मध्ये बीएसएनएलचा ७६९ रुपयाचा प्लान आहे.
वाचाः गुगलवर चुकूनही सर्च करू नका या ५ गोष्टी, १० लाखाच्या दंडासोबत जेलची हवा खावी लागेल