टेलिकॉम कंपनी एअरटेलने नुकतेच आपल्या सर्व प्रीपेड आणि पोस्टपेड यूजर्ससाठी अनलिमिटेड 5G डेटा ऑफर लाँच केला आहे. Airtel 5G Plus नेटवर्क परिसरात राहणाऱ्या Airtel यूजर्सला ५जी सपोर्ट स्मार्टफोनवर अनलिमिटेड, फास्ट 5G डेटाची मजा मिळू शकते. ही ऑफर प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाइल कनेक्शनच्या सर्व यूजर्ससाठी आहे. ज्यांच्याकडे २३९ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त अॅक्टिव डेटा प्लान आहे. या प्लानमध्ये विना बफरिंगद्वारे जिओ सिनेमा अॅप वर IPL 2023 चे सामने पाहू शकता.
Airtel 399 plan
३९९ रुपयाचा प्लान २८ दिवसाच्या वैधते सोबत येतो. यात डिज्नी प्लस हॉटस्टार मोबाइलसाठी ३ महिन्याचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. एअरटेल सर्व लोकल, एसटीडी आणि रोमिंग नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग सोबत डेली १०० एसएमएस आणि २.५ जीबी डेटाचा फायदा मिळतो.
Airtel 499 plan
यूजर्सला जास्त डेटाचा वापर करायचा असेल तर एअरटेलचा ४९९ रुपयाचा प्लान बेस्ट ठरू शकतो. हा प्लान २८ दिवासाच्या वैधते सोबत डेली ३ जीबी डेटाचा फायदा, डेली १०० एसएमएस आणि अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग मिळते. या प्लानमध्ये यूजर्सला डिज्नी प्लस हॉटस्टार मोबाइलचे ३ महिन्याचे सब्सक्रिप्शन आणि फ्री हॅलो ट्यून्स सारखे अतिरिक्त फायदे मिळते.
वाचाः IPL 2023: हॉटस्टारची गरज नाही, या ठिकाणी ऑनलाइन पाहू शकता IPL सामने
Airtel 839 plan
ज्या यूजर्सला दर महिन्याला रिचार्ज करण्यापासून दूर राहायचे आहे. त्यांच्यासाठी हा प्लान बेस्ट आहे. एअरटेलचा ८३९ रुपयाचा प्लान अनलिमिटेड कॉलिंग सोबत ८४ दिवसाच्या वैधते सोबत येतो. डेली १०० एसएमएस आणि डेली २ जीबी डेटाचा फायदा मिळतो. यूजर्सला डिज्नी प्लस हॉटस्टार मोबाइलचे ३ महिन्याचे फ्री सब्सक्रिप्शन आणि बाकीचे बेनिफिटस मिळते.
Airtel 3359 plan
३५६ दिवसाच्या वैधतेच्या या प्लानमध्ये डेली १.५ जीबी डेटा, एसएमएस आणि अनलिमिटेड व्हाइस कॉलिंगचा फायदा मिळतो. याशिवाय, यूजर्सला Disney Plus Hotstar Mobile आणि Amazon Prime Video मोबाइल एडिशनचे १ वर्षासाठी सब्सक्रिप्शन फ्री मध्ये मिळते.
वाचाः iPhone 14 ला अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी, ४५ हजारांची बंपर सूट