School Holidays: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, एप्रिलमध्ये शाळेला इतक्या दिवसांची सुट्टी

School Holidays in April: दहावी, बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत. आता अनेक ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षांची लगबग सुरु आहे. यासोबतच मुलांनाही सुट्टीची स्वप्न पडू लागली आहेत. एप्रिल महिन्यात अनेक सण येत आहेत आणि यासह शनिवार आणि रविवारची सुट्टी तर आहेच. गुड फ्रायडे, ईद, रमजान असे अनेक मोठे सण एप्रिलमध्ये येत असल्याने मुलांना लांब सुट्ट्या मिळत आहेत. प्रवासाची योजना आखत असलेल्या पालकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. एप्रिलमध्ये किती दिवस शाळेला सुट्टी आहे? हे जाणून मुलांनाही खूप आनंद होईल.

एप्रिलमध्ये शाळेत शिकणाऱ्या मुलांना जास्त दिवस मौजमजा होणार आहे. त्यांना सलग अनेक दिवस सुट्या मिळणार आहेत, त्याचप्रमाणे या महिन्यात ५ रविवार असून अनेक शाळांमध्ये शनिवारच्या सुट्याही दिल्या जात आहेत. येथे आपण एप्रिल महिन्यातील सुट्ट्यांची यादी

शाळांमधील सुट्ट्यांची यादी

१ एप्रिल – शनिवार
२ एप्रिल – रविवार
४ एप्रिल – महावीर जयंतीची सुट्टी
७ एप्रिल – गुड फ्रायडे
८ एप्रिल – शनिवार
९ एप्रिल – रविवारची सुट्टी.
१४ एप्रिल – आंबेडकर जयंती
१५ एप्रिल – शनिवार.
१६ एप्रिल – रविवार
२१ एप्रिल – रमजान
२२ एप्रिल – ईद उल फित्र
२३ एप्रिल – रविवार
२९ एप्रिल – जानकी नवमी
३० एप्रिल – रविवार

IGNOU Job: बारावी उत्तीर्णांना इग्नूमध्ये नोकरी करण्याची संधी, ६३ हजारपर्यंत मिळेल पगार
Teachers Job: राज्यात एप्रिलमध्ये होणार तीस हजार शिक्षकांची भरती

जवळपास १५ दिवस शाळा बंद

यंदा एप्रिल महिन्यात ५ रविवार आणि ५ शनिवार असल्याने त्यादिवशी शाळा बंद असतील. काही शाळांना शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर काहींना शनिवारी अर्ध्या दिवसाची शाळा असते. याशिवाय अनेक महापुरुषांच्या जयंती आहेत. एप्रिलमध्ये महावीर जयंती, आंबेडकर जयंती, गुड फ्रायडे, ईद देखील असते ज्यामुळे मुलांना लांब सुट्टीचा आनंद घेता येईल.

KVS Admission: पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा किती? केंद्रीय विद्यालयांकडून नियम जाहीर

Source link

Good News For ChildrenGood news for studentsSchool Holidays in AprilSchool Holidays in April 2023School summer vacationsSchool summer vacations 2023schools will remain closedschools will remain closed in April
Comments (0)
Add Comment