फ्री मध्ये नाही मिळणार ब्लू टिक
देशात प्रसिद्ध समजल्या जाणाऱ्या प्रोफाइलला फ्री मध्ये ब्लू टिक दिली जात होती. यात राजकारणी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता, सेलिब्रिटी आणि अन्य काही लोकांचा समावेश होता. परंतु, आता या सर्वांना ब्लू टिकसाठी पैसे द्यावे लागतील. यासाठी यूजर्सला आपल्या मोबाइल नंबरवरून व्हेरिफिकेशन करावे लागेल.
वाचाः iPhone 14 ला अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी, ४५ हजारांची बंपर सूट
ट्विटरमध्ये दिसतील हे पाच बदल
जर तुम्ही अजूनही Twitter Blue टिकचे सब्सक्रिप्शन घेतले नसेल तर तुमच्या प्रोफाइलवर दिसणारी ब्लू टिक आजपासून दिसणार नाही. म्हणजेच तुमचे अकाउंट सामान्य यूजरप्रमाणे दिसेल.
जर तुम्ही ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शन घेत असाल तर तुम्हाला अनेक फायदे मिळतील. यात सर्वात पहिले ट्विटच्या कॅरेक्टरची लिमिट वाढेल. याचाच अर्थ १८० कॅरेक्टर हून जास्त तुम्ही ट्विट करू शकता.
वाचाः सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, नवा फोन खरेदीआधी या ठिकाणी पाहा ‘टॉप ५’ फोनची लिस्ट
ट्विटर ब्लू सब्सक्रायबर्सला एडिटचे ऑप्शन मिळेल. याचाच अर्थ ट्विटला काही वेळेसाठी एडिट किंवा अनडू करता येईल. ट्विटर ब्लू सब्सक्रायबर्सला टू फॅक्टर ऑथेंटिकेशनची सुविधा मिळेल. याशिवाय, ट्विटर ब्लू टिक होल्डरच्या प्रोफाइल आणि अकाउंटला जास्त महत्त्व मिळणार आहे. त्यांचे ट्विट आणि व्हिडिओ जास्त हायलाइट केले जातील.
वाचाः Mi 32 Inch Smart TV मिळतोय अर्ध्या किंमतीत, अशी ऑफर पुन्हा नाही