छत्रपती संभाजीनगर पालिकेत विविध पदांची भरती, जाणून घ्या तपशील

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर

महापालिकेत ११० पदांची भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी महापालिकेने सरकरी निर्देशांनुसार खासगी संस्थेची नियुक्ती केली आहे. पुढील दोन वर्षांत नोकरभरतीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

पालिकेतील नोकरभरतीबद्दल अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांनी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, ‘सध्या बिंदुनामावली अंतिम करण्याचे काम सुरू आहे. राज्य सरकारने नोकरभरतीसाठी नियुक्त केलेल्या एजन्सीपैकी आयबीपीएस या संस्थेची निवड महापालिकेने केली आहे. एजन्सीनेदेखील नोकरभरती करून देण्याची तयारी दाखवली आहे.

जाहिरातीचा आराखडा तयार करून पाठवा असे एजन्सीने कळवले आहे. त्यानुसार आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. बिंदुनामावली अंतिम झाल्यावर पुढील दोन महिन्यांत नोकरभरतीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.’

राज्य सरकारने महापालिकेचा आकृतीबंध मंजूर केला आहे. मंजूर केलेल्या आकृतीबंधात पदांची मंजूर संख्या पाच हजार २०२ आहे. त्यापैकी दोन हजार ९६५ पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत. दोन हजार २३७ पदे रिक्त आहेत. रिक्तपदांपैकी १२५ पदांवर भरती करण्याची परवानगी सरकारने महापालिकेला दिली आहे. त्यापैकी ११५ पदे भरण्याचा निर्णय पालिकेच्या प्रशासनाने घेतला. ११५ पैकी पाच पदे अनुकंपा तत्त्वावर भरण्यात आल्यामुळे आता ११० पदांसाठी नोकरभरती केली जाणार आहे.

पदाचे नाव संख्या

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) २६

कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) ०७

कनिष्ठ अभियंता (विद्युत) १०

कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर) ०१

लेखापरीक्षक ०१

लेखापाल ०२

विद्युत पर्यवेक्षक ०३

अभियांत्रिकी सहायक १३

स्वच्छता निरीक्षक ०७

पशूधन पर्यवेक्षक ०२

प्रमुख अग्निशमन अधिकारी ०९

अग्निशमन अधिकारी २०

कनिष्ठ लेखापाल ०२

लेखा विभाग लिपिक ०५

Source link

chhatrapati sambhajinagar municipalityGovernment jobJob 2023job vacancyMaharashtra Timesmunicipal jobrecruitmentछत्रपती संभाजीनगर पालिकापालिका नोकरभरती
Comments (0)
Add Comment