चहलबाजी चालली… हैदराबादचे वस्त्रहरण करत राजस्थानचा मोठा विजय, इतिहास रचत विजयी बोहनी

हैदराबाद : पहिल्याच सामन्यात कशी अफलातून कामगिरी करायची, याचा उत्तम वस्तुपाठ राजस्थान रॉयल्सच्या संघाने यावेळी दाखवून दिला. धडाकेबाज फटकेबाजी करत त्यांनी २०३ धावांचा डोंगर रचला. या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या हैदराबादची राजस्थानच्या गोलंदाजांनी पळता भूई थोडी करून ठेवली. त्यामुळेच हैदराबादला फक्त १३१ धावा करता आल्या आणि राजस्थानला ७२ धावांनी दणदणीत विजय मिळवता आला.राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना इतिहास रचला. कारण आतापर्यंत या आयपीएलमध्ये कोणत्या संघाला दोनशे धावांचा पल्ला गाठता आला नव्हता. जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल यांनी संघाला तुफानी सुरुवात करून दिली. या दोघांनी सुरुवातीपासूनच हैदराबादच्या गोलंदाजांवर आक्रमक करायला सुरुवात केली. हे आक्रमण एवढे जबरदस्त होते की, हैदराबादच्या गोलंदाजांकडे त्याचे उत्तर नव्हते. बटलरने तर यावेळी २२ चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५४ धावांची वादळी खेळी साकारली. यशस्वीने यावेळी ३७ चेडूंत ९ चौकारांच्या जोरावर ५४ धावांची खेळी केली. राजस्थानचा संघ फक्त तेवढ्यावर थांबला नाही तर त्यानंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने दमदार फलंदाजी केली आणि ३२ चेंडूंत ३ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ५५ धावांची खेळी साकारली. त्यामुळेच राजस्थानला या सामन्यात २०३ धावा करता आल्या.

राजस्थानच्या आव्हानाचा पाठलाग करायला हैदराबादचा संघ उतरला खरा, पण वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने एकाच षटकातदोन बळी मिळवत आपले इरादे स्पष्ट केले. या धक्क्यातून हैदराबादचा संघ उभारी घेऊ शकला नाही. त्यानंतर फिरकीपटू युजवेंद्र चहलनेही चार बळी मिळवले आणि हैदराबाचे कंबरडे मोडले. त्यामुळे हैदराबादची ६ बाद ५२ अशी अवस्था झाली होती. त्यामुळे हैदराबादचा संघ आता हा सामना जिंकणार नाही, हे स्पष्ट झाले होते.

मुंबईत सामना जिंकला आणि बंगळुरुत फटाके फुटले; स्वतःसाठी जमलं नाही ते आरसीबीसाठी केलं

राजस्थानच्या संघाने फलंदाजीबरोबरच गोलंदाजीमध्येही कमाल केली. फटकेबाजी करत त्यांनी २०३ धावांचा डोंगर रचला. त्यानंतर युजवेंद्र चहल आण ट्रेंट बोल्ट यांनी राजस्थानच्या गोलंदाजीमधील भेदकता यावेळी दाखवल्याचे पाहायला मिळाले.

Source link

iplipl 2023rajasthan royalsrr beat srh by 72 runsrr vs srhsunrisers hyderabadtata ipltata ipl 2023yuzvendra chahal
Comments (0)
Add Comment