वाचू का, वाचू का? एकनाथ शिंदे यांची हुबेहूब मिमिक्री, ठाकरे स्टाईलने खरडपट्टी!

छत्रपती संभाजीनगर : तुम्ही आणखी काय चोरणार माझं? माझ्या आई वडिलांचे, आई जगदंबेचे आणि जनता-जनार्दनाचे मला असलेले आशीर्वाद तर तुम्ही चोरु शकत नाही ना? तुमच्या सभेला तुम्ही खुर्च्या भाड्याने आणू शकता, पण माणसं आणू शकत नाही. भलेही माणसं आणाल पण ते भाषण संपेपर्यंत खुर्चीवर बसत नाही, अशी टीका करताना, वाचू का…? वाचू का? असं समोरच्यांना विचाराल पण निवडणुकीत ज्यावेळी ही जनता मतदानाला उतरेल त्यावेळी मात्र तुम्ही वाचू शकणार नाही, असा घणाघाती हल्ला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर चढवला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांची हुबेहूब मिमिक्रीही केली.पक्षचिन्ह आणि पक्षनाव गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी जनतेच्या दरबारात जाऊन त्यांचे आशीर्वाद घेण्याचं ठरवलंय. याकामी महाविकास आघाडीचे नेतेही ठाकरेंच्या सोबत आहेत. लोकसभा आणि विधानसभेला जेमतेम वर्ष-दीड वर्ष बाकी असताना मविआने निवडणुकांचं वातावरण आतापासूनच तापवायला सुरुवात केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांची संभाजीनगरमधील ज्या ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा झाली, त्याच मैदानावर मविआची सभा पार पडली. अशोक चव्हाण, अजित पवार यांच्या दणकेबाज भाषणानंतर उद्धव ठाकरे यांनी घणाघाती भाषण केलं.

शिवरायांचा अवमान झाला तेव्हा मूग गिळले होते की दातखीळ बसली होती? अजितदादा ऑन फायर
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचं सांगत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सुरुवातीचं संबोधन ‘वाचू का?’ म्हणून मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना विचारलं. त्याचाच धागा पकडून आजच्या संभाजीनगरच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना लक्ष्य केलं.

लक्षात ठेवा सभेला तुम्ही खुर्च्या भाड्याने आणू शकाल, पण माणसं आणू शकत नाही. माणसंही आणाल पण ते भाषण संपेपर्यंत खुर्चीवर बसत नाही. बरं आज तुम्ही वाचू का? वाचू का? असं समोरच्यांना विचारताय पण निवडणुकीत ज्यावेळी ही जनता मतदानाला उतरेल त्यावेळी मात्र तुम्ही वाचणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणताच उपस्थित लोकांनी जोरदार टाळ्या शिट्ट्यांनी प्रतिसाद दिला.

काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटले म्हणता, मिंधेंसह नितीशकुमारांचं तुम्ही काय चाटलं? ठाकरेंचा थेट शाहांना सवाल
संकट येते तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी मदत केली. भाजपची पालखी व्हायला शिवसेनेचा जन्म झाला नाही तो भूमीपुत्रांसाठी झाला. आता कोण आहे भाजप सोबत? आपले नाव, चिन्ह आणि वडील चोरले. यांचे वडील म्हणत असतील काय दिवटं कारटं निघालं. यांना बाप पण दुसरे लागतात. मोदींना घेऊन या…. मी माझ्या वडिलांचे नाव घेऊन येतो. मला जनतेचे आशीर्वाद ते तुम्ही चोरु शकत नाही. इतरांचे विचार ते वाचू का विचारताय… पण जनता मतदानाला उतरेल तेव्हा तुम्ही वाचणार नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदे यांना ललकारलं.

Source link

chhatrapati sambhajinagar mva rallyCM Eknath Shindemahavikas aaghadimahavikas aaghadi sabhamahavikas aaghadi vajramuth sabhaUddhav Thackerayuddhav thackeray slam cm eknath shindeउद्धव ठाकरेउद्धव ठाकरे एकनाथ शिंदे मिमिक्रीछत्रपती संभाजीनगर
Comments (0)
Add Comment