आता एनसीईआरटीची पुस्तके वापरणारे सर्व बोर्ड या नवीन नियमाचे पालन करणार आहेत. मुख्यतः सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमात बदल होणार आहे. याशिवाय, यूपी बोर्डाच्या इतर एनसीईआरटी पुस्तकांमध्ये हा बदल लागू होणार आहे.
बदल या वर्षापासून लागू
हा बदल शैक्षणिक सत्र २०२३-२४ पासून लागू होणार आहे. अद्ययावत अभ्यासक्रमानुसार, NCERT ने ‘किंग्स अँड क्रॉनिकल्स; मुघल दरबार (१६वे आणि १७वे शतक)’ ‘थीम ऑफ इंडियन हिस्ट्री-भाग II’ या इतिहासाच्या पुस्तकातून काढून टाकण्यात आले आहे.
नागरिकशास्त्राच्या अभ्यासक्रमातही बदल
इतिहासासोबतच NCERT ने नागरिकशास्त्राचा अभ्यासक्रमही बदलला आहे. ‘अमेरिकन हेजेमनी इन वर्ल्ड पॉलिटिक्स’ आणि ‘द कोल्ड वॉर एरा’ यासारखे धडे काढून टाकण्यात आले आहेत. तसेच, बारावीच्या ‘इंडियन पॉलिटिक्स आफ्टर इंडिपेंडन्स’ या पाठ्यपुस्तकातून ‘राइज ऑफ पॉप्युलर मूव्हमेंट्स’ आणि ‘एरा ऑफ वन-पार्टी डोमिनेन्स’ हे प्रकरण वगळण्यात आले आहेत.
दहावीच्या अभ्यासक्रमात बदल
बारावी सोबतच NCERT ने दहावी आणि अकरावीची काही पुस्तके देखील काढून टाकली आहेत. ‘थीम इन वर्ल्ड हिस्ट्री’ या इयत्ता अकरावीच्या पाठ्यपुस्तकातून ‘सेंट्रल इस्लामिक लँड्स’, ‘क्लॅश ऑफ कल्चर’ आणि ‘इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन’ यांसारखे धडे काढून टाकण्यात आले आहेत.
यासोबतच इयत्ता दहावीच्या ‘डेमोक्रॅटिक पॉलिटिक्स-II’ या पाठ्यपुस्तकातून ‘लोकशाही आणि विविधता’, ‘लोकप्रिय संघर्ष आणि चळवळी’, ‘लोकशाहीची आव्हाने’ हे प्रकरण काढून टाकण्यात आले आहेत.
यूपी बोर्डाकडून अभ्यासक्रम अपडेट
उत्तर प्रदेश बोर्डाचे सचिव दिव्यकांत शुक्ला यांनी पुस्तकातील बदलांच्या माहितीला दुजोरा दिला. नवीन अभ्यासक्रम यूपी बोर्ड अभ्यासक्रम २०२३-२४ मध्ये अपडेट करण्यात आला आहे. तो लवकरच अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासोबतच नवीन अभ्यासक्रम असलेली पुस्तके बाजारात उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.