१०० वॉटच्या चार्जिंग सोबत Realme GT Neo 5 SE लाँच, पाहा किंमत

नवी दिल्लीः रियलमीने आपला नवीन फोन Realme GT Neo 5 SE ला चीनमध्ये लाँच केले आहे. Realme GT Neo 5 SE ला १६ जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगन 7+ Gen 2 प्रोसेसर सोबत लाँच करण्यात आले आहे. या फोनमध्ये 1.5K रिझॉल्यूशनचा डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे. या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा दिला आहे. सोबत ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स दिला आहे. Realme GT Neo 5 SE मध्ये 4,500mm चा स्क्वॉयर 3D टेंपर्ड वेपर चेंबर (VC) कूलिंग एरिया दिला आहे. Realme GT Neo 5 SE 100W च्या फास्ट चार्जिंग सोबत येतो.

Realme GT Neo 5 SE ची किंमत
Realme GT Neo 5 SE च्या ८ जीबी रॅम सोबत २५६ जीबी स्टोरेजची किंमत १९९९ चीनी युआन म्हणजेच जवळपास २४ हजार रुपये आहे. तर १२ जीबी रॅम सोबत २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २१९९ चीनी युआन म्हणजेच २६ हजार २०० रुपये आहे. तर १६ जीबी रॅम प्लस १ टीबी पर्यंत मॉडलची किंमत २५९९ चीनी युआन म्हणजेच ३१ हजार रुपये ठेवली आहे.

Realme GT Neo 5 SE चे स्पेसिफिकेशन

Realme GT Neo 5 SE मध्ये अँड्रॉयड 13 सोबत Realme UI 4.0 आहे. फोनमध्ये 6.74 इंचाची 1.5K रिझॉल्यूशन पिक्सलचा डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे. डिस्प्लेचा पीक ब्राइटनेस 1400 निट्स आहे. कलर गेमट DCI-P3 चा सपोर्ट दिला आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7+ Gen 2 प्रोसेसर, ग्राफिक्ससाठी Adreno GPU 725,१६ जीबी रॅम आणि GT mode 4.0 मिळतो. फोनमध्ये १ टीबी पर्यंत स्टोरेज मिळतो.

वाचाः Dell चा ९० हजाराचा जुना लॅपटॉप मिळतोय फक्त १७ हजारात, रीफर्बिश्ड लॅपटॉप काय आहे, पाहा

Realme GT Neo 5 SE कॅमेरा आणि बॅटरी

रियलमीच्या या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे दिले आहेत. ज्यात प्रायमरी लेन्स ६४ मेगापिक्सलचा आहे याचा अपर्चर f/1.79 आहे. दुसरा लेन्स ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि तिसरा लेन्स २ मेगापिक्सलचा मायक्रो आहे. फ्रंट मध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ, GPS, ग्लोनास, BeiDou, Galileo, QZSS, NFC आणि यूएसबी टाईप-सी पोर्ट दिले आहे. फोनमध्ये डॉल्बी एटमॉस स्पीकर दिले आहे. यात 5500mAh ची बॅटरी दिली आहे. सोबत 100W ची फास्ट चार्जिंग दिली आहे.

वाचाः Sony Bravia च्या ६५ इंच स्मार्ट टीव्हीवर ७६ हजाराची सूट, पाहा नवीन किंमत

Source link

Realme GT Neo 5 SERealme GT Neo 5 SE featuresRealme GT Neo 5 SE launchedRealme GT Neo 5 SE priceरियलमी स्मार्टफोन
Comments (0)
Add Comment