नवी दिल्लीः Budget Smartwatch under 3000 : स्मार्टवॉच म्हणजे सध्या एकाच घड्याळात अनेक फीचर्स असणारं एक अफलातून डिव्हाईस आहे. मोठ्या प्रमाणात बच्चे कंपनीपासून ते तरुण आणि वृद्ध लोकही स्मार्टवॉच वापरताना दिसतात. त्यात मार्केटमध्ये सर्वांच्या बजेटमध्ये बऱ्याच प्रकारचे स्मार्टवॉचेस आता उपलब्ध असल्याने याचा वापर वाढतच आहे. अगदी १००० पासून ते १००००० किंमतीपर्यंत स्मार्टवॉच मिळत असून यातील ३००० हून कमी किंमतीच्या काही दमदार स्मार्टवॉचेसबद्दल जाणून घेऊ…
Amazfit Bip 3 (किंमत १,९९९ रुपये)
तर ३००० हून कमी किंमतीच्या काही ब्रँडेड स्मार्टवॉचेसचा विचार केला तर यामध्ये अमेझफिट या कंपनीचं Amazfit Bip 3 हे स्मार्टवॉच एक चांगला पर्याय आहे. विशेष म्हणजे ही अमेझफिट कंपनी स्मार्टवॉचेससाठीच फार प्रसिद्ध असून हे Amazfit Bip 3 मॉडेल अगदी लूकमध्ये अॅपल वॉचप्रमाणे आहे. 5ATM रेटिंगसह या वॉचमध्ये ६० हून अधिक स्पोर्ट्स मोड आहेत. ज्यात GPS ट्रॅकिंग तसंच हार्ट रेट सेंसर अशा दमदार फीचर्सचा समावेश आहे. तर या वॉचची किंमत १,९९९ रुपये इतकी आहे.
Redmi Watch 2 Lite (किंमत २,४९९ रुपये)
स्मार्टफोन्ससाठी प्रसिद्ध कंपनी रेडमी (Redmi) ची Redmi Watch 2 Lite ही स्मार्टवॉचही ३००० रुपये किंमतीच्या आतील एक झक्कास वॉच आहे. विविध कलर्समध्ये ही वॉच उपलब्ध असून विशेष म्हणजे या वॉचला प्रोटेक्शनसाठी 2.5D ग्लास देण्यात आलं आहे. यामध्ये हार्ट सेंसरसह ऑक्सिजन लेव्हल (SpO2) मोजता येणार आहे. तसंच तब्बल १०० एक्सरसाईज ट्रॅकिंग फीचर्स या स्मार्टवॉचमध्ये आहेत. या वॉचची किंमत २,४९९ रुपये इतकी आहे.

वाचाः Nothing Phone 1 एक जबरदस्त डील, मोठ्या डिस्काउंट सोबत खरेदीची संधी
boAt Xtend (किंमत १,७९९ रुपये)
तर आपण पाहत असलेल्या स्मार्टवॉचेसमधील सर्वात स्वस्त आणि मस्त वॉच म्हणाल तर बोट कंपनीची boAt Xtend ही वॉच असून ही सध्या अमेझॉनवर सर्वाधिक विक्री होणारी वॉच आहे. १.६९ इंचच्या डिस्प्लेसह येणारी ही वॉच GPS ट्रॅकिंग हार्ट रेट सेंसर, SpO2 या खास फिचर्ससह येते. विशेष म्हणजे अॅमेझॉन एलेक्स सपोर्ट या वॉचला देण्यात आला असून अॅड्रॉईड आणि ios अशा दोन्हीमध्ये ही वॉच वापरली जाऊ शकते.
वाचाः iPhone 14 Price : लेटेस्ट आयफोन घेण्यासाठी हीच आहे योग्य वेळ, लेटेस्ट मॉडेलवर खास ऑफर