चैत्र पौर्णिमा तिथी मुहूर्त
पौर्णिमा तिथी ५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच ६ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० वाजून ५मिनिटापर्यंत सुरू राहील. म्हणूनच जे पौर्णिमेचे व्रत पाळतात ते ५ एप्रिलला पौर्णिमा व्रत पाळू शकतात. तर दुसरीकडे ६ एप्रिलला पौर्णिमा असल्याने ६ एप्रिलला हनुमान जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. दुसरीकडे, पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे, म्हणून पौर्णिमेच्या दिवशी उपवास ठेवणाऱ्यांनी ५ एप्रिल रोजी उपवास ठेवावा. तसेच, ५ एप्रिल रोजीच सत्यनारायणाचा व्रत करण्यात येणार आहे.
Solar Eclipse 2023: एप्रिल महिन्यात सूर्यग्रहण; ‘या’ ७ राशीच्या लोकांनी जरा सांभाळून, होईल मानसिक गोंधळ
चैत्र पौर्णिमेचे महत्व
चैत्र महिन्यात मार्तंड भैरव अवतार दिन, श्री शिलाई देवी चैत्र पौर्णिमा उत्सव, होम हवन व पालखी सोहळा असतो. हा हनुमानाचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. या दिवशी हनुमानाच्या देवळात पहाटेपासूनच किर्तनाला प्रारंभ करतात. चैत्र पौर्णिमा या दिवशी शिवाजी महाराज यांची पुण्यतिथीही असते. याच दिवशी सुजाताचे भगवान बुद्धास खीर दिली होती. असं म्हणतात चैत्र पौर्णिमेस कृष्ण देवांनी रासलीला केली होती आणि सर्व गोपीकांसोबत कृष्ण देवांनी रात्रभर नृत्य केले होते. ब्रज मध्ये केलेल्या या उत्सवास महारास असेही म्हणतात. पौर्णिमेला सूर्यास्तानंतर चंद्र पूर्वेकडून उगविताना मोठ्या आकाराचा दिसेल. हिंदू वर्षानुसार ही या वर्षातली पहिली पौर्णिमा आहे.
Venus Transit: शुक्र वृषभ राशीत मार्गी, एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यापासून ‘या’ ६ राशींना मिळेल प्रगतीची संधी
चैत्र पौर्णिमा पूजा विधी
पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी स्नान करावे. लक्षात ठेवा, स्नान करताना पाण्यात गंगाजल टाकावे. स्नान वगैरे झाल्यावर सूर्याच्या मंत्रांचे पठण करताना सूर्यदेवाची पूजा करावी. यानंतर व्रताचा संकल्प घेऊन सत्यनारायणाची पूजा करावी. यानंतर रात्री चंद्र देवाची पूजा करावी. चंद्रदेवाला दूधाचे अर्घ्य द्यावे.
पुराणांनुसार चैत्र पौर्णिमेस विशेष पूजा केल्यास विष्णू देवांची कृपादृष्टी आपल्यावर असते. व्रत करणाऱ्या व्यक्तिस चंद्र देवांचा विशेष आशिर्वाद लाभतो आणि दान धर्म केल्यास चंद्र देव प्रसन्न होतात तसेच सुख समृद्धीचा आशीर्वाद मिळतो. गंगेत स्नान केल्याने सर्व दुख दूर होतात. या दिवशी तुळशी मातेची विशेष पूजा केल्याने लक्ष्मी मातेची कृपा सदैव राहते.
गॅस, मिक्सर, फ्रिजपासून ते भांड्यापर्यंत कोणती गोष्ट कुठे असावी? पाहा स्वयंपाकघरातील वास्तुशास्त्राचे नियम