इच्छुक आणि पात्र उमेदवार चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर, चॅनल मॅनेजर सुपरवायझर आणि सपोर्ट ऑफिसर या पदांची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत एकूण १०२२ पदे भरली जाणार आहेत. SBI द्वारे Anytime चॅनेल अंतर्गत कराराच्या आधारावर भरती केली जाणार आहेत.
पात्रता निकष
विशेष बाब म्हणजे तरुण उमेदवार अर्ज प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाहीत. या पदांसाठी फक्त SBI किंवा इतर कोणत्याही सरकारी बँकेतील निवृत्त कर्मचारी अर्ज करू शकतात.
SBI मधील भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. यासाठी प्रथम प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून निवड केली जाईल. या उमेदवारांना मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाईल. १०० गुणांच्या मुलाखतीच्या आधारे अंतिम निवड यादी तयार केली जाईल.
स्टेट बॅंकेच्या पदभरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज प्रक्रियेत सामील होण्यासाठी ३० एप्रिल २०२३ पर्यंत नोंदणी करू शकतात. इच्छुक उमेदवार अर्ज करण्यासाठी sbi.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा