तर रिपोर्ट्सनुसार, एक WhatsApp मेसेज सध्या व्हायरल होत असून त्यात लिहिल्याप्रमाणे केंद्र सरकार सर्व भारतीय यूजर्सना २३९ रुपयांचा फ्री फोन रिचार्ज देत आहे. हा मेसेज तुफान व्हायरल होत असून या मेसेजमध्ये लिहिलं आहे की, हा रिचार्ज २८ दिवसांसाठी वैध आहे. दरम्यान याचा वापर करण्याकरता तुम्हाला एका लिंकवर क्लिक करनं जरुरी आहे, असंही यात सांगितलं जातं. पण समोर आलेल्या माहितीनुसार हा मेसेज फेक असल्याचं समोर आलं आहे. केंद्र सरकारने अशाप्रकारची कोणत्याही ऑफरची घोषणा केलेली नाही.
वाचाः Budget Smartwatch : स्वस्तात मस्त स्मार्टवॉच! ३००० हून कमी किंमतीतील या टॉप ४ ब्रँडच्या वॉचेस
कशी आणि काय काळजी घेणार
जर तुम्हाला कोणताही फेक मेसेज आला असेल तर तो ओळखणं खूप गरजेचे आहे. जर तुम्हाला कोणत्याही मेसेजमध्ये पैसे किंवा भेटवस्तू देण्याचे आमीष दाखवले जात असेल तर समजून घ्या की हा मेसेज फेक आहे. अशा मेसेजमध्ये तुम्हाला लिंक दिलेली असते, चुकूनही या लिंकवर क्लिक केल्यास तुमच्या खात्यातून पैसे चोरीला जाऊ शकतात. तर असे मेसेज ओळखण्यासाठी, तुम्हाला मेसेज कसा लिहिला आहे, अर्थात मेसेजच्या भाषेकडे देखील लक्ष द्यावे लागेल. जर मेसेजच्या भाषेत काही चूक असेल तर तुम्हाला त्या मेसेजकडे अधिक लक्ष देण्याची गरज नाही, कारण हे संदेश फेक असल्याचं कळून येतं. कारण एखाद्या ब्रँडेड कंपनीने पाठवलेल्या मेसेजमध्ये अशा प्रकारची चूक नसते. याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेसेजमधील कोणत्याही लिंकवर क्लिक करु नये.
वाचाः Nothing Phone 1 एक जबरदस्त डील, मोठ्या डिस्काउंट सोबत खरेदीची संधी
वाचाः आयपीएल मॅचेस पाहण्यासाठी डेटा पुरत नाही? भरघोस डेली डेटा असणारे हे प्रीपेड प्लॅन्स पाहिलेत