AC Cooling Tips : तुमचा AC कधीच बिघडणार नाही, या गोष्टींची काळजी घ्या

How to Prevent Gas leakage in AC : आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि अशा परिस्थितीत आराम मिळण्यासाठी एसीचा वापर करणं म्हणजे केवळ चैनीची गोष्ट नाही तर गरज होऊ लागली आहे. आता तुम्हीही जर एसी वापरत असाल किंवा नवा एसी घेण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टींकडे लक्ष देणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण सध्याच्या स्थितीत एअर कंडीशनर अर्थात एसीचा वापर वाढल्याने त्याच्या सर्व्हिसिंगचा खर्चही खूप येतो. त्यात एसीमध्ये काही अडचणी असल्यास खर्च आणखीच वाढतो. त्यात एसी वेळेवर दुरुस्त न केल्यास किंवा त्याच्या सर्व्हिसिंगमध्ये निष्काळजीपणा केल्यास एसीमध्ये गॅस लिकेजची समस्या उद्भवते. बहुतांश एसी बिघडण्याचं कारण गॅस लिकेजच असून एसीच्या गॅस लिकेजचा खर्चही खूप जास्त होतो. पण जर वेळेवर सर्व्हिसिंग आणि योग्य काळजी घेतल्यास या समस्येपासून वाचता येऊ शकते. तर जाणून घेऊ एसीच्या गॅस लिकेजपासून वाचण्याचे सोपे उपाय.

​योग्यवेळी सर्व्हिसिंग​

जर तुम्ही उन्हाळ्याच्या सुरुवातीला एसीची सर्व्हिस न करता एसी चालू केला असेल तर तो खराब होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे योग्यवेळी सर्व्हिसिंग एसी ऐन उन्हाळ्यातच खराब होऊ शकतो. त्यामुळे AC ची योग्यवेळी सर्व्हिसिंग केल्यावर एसीमध्ये आणखी काही बिघाड असल्यास ते ही कळते. गॅसची लेव्हलही सर्व्हिसिंगमधून कळून येते.

​वाचाः Budget Smartwatch : स्वस्तात मस्त स्मार्टवॉच! ३००० हून कमी किंमतीतील या टॉप ४ ब्रँडच्या वॉचेस

​एसीमध्ये कार्बनची समस्या​

एसीमध्ये कार्बन जमा होत असेल तर त्यामुळेही गॅस लिकेजची शक्यता खूप वाढते. कार्बनमुळे एसीच्या कंडेन्सर पाईपला गंज लागू शकतो आणि एसीचं कूलिंग कमी होईल आणि गॅस गळतीची समस्याही वाढू शकते. तर कार्बन जमा होण्यापासून बचाव करण्याकरताही एसीची वेळोवेळी सर्व्हिसिंग महत्त्वाची आहे.

​वाचाः Nothing Phone 1 एक जबरदस्त डील, मोठ्या डिस्काउंट सोबत खरेदीची संधी ​

​एसी कॉम्प्रेसर सुटसुटीत जागेत ठेवावा​

तर आपण सारेज जाणतो की एसी समोरच्या बाजूने थंड हवा फेकतो आणि एसीचा बाहेर असणारा भाग म्हणजेच कॉम्प्रेसर गरम हवा फेकतो. दरम्यान कॉम्प्रेसरच्या आसपास अधिक सामान ठेवल्यास एसीतून गरम हवा नीट बाहेर पडू शकत नाही आणि अशावेळी एसी लवकर खराब होऊ शकतो. दरम्यान एसीचे कॉम्प्रेसर युनिट बाहेर ठेवलेले असते. त्याठिकाणी घरातील पाळीव प्राणी गेल्यास त्यांनी लघवी वैगेरे केल्यासही कॉम्प्रेसर परिणामी एसी खराब होऊ शकतो.

​वाचाः आयपीएल मॅचेस पाहण्यासाठी डेटा पुरत नाही? भरघोस डेली डेटा असणारे हे प्रीपेड प्लॅन्स पाहिलेत ​

​ड्रेनेज तपासणंही महत्त्वाचं​

एसीची ड्रेनेज सिस्टीम योग्य प्रकारे काम करत आहे की नाही हे देखील तपासणं गरजेचं आहे. जर असं झालं तर कूलंट लीक होण्याची शक्यता जास्त असते. एसीची ड्रेनेज सिस्टीम पाणी बाहेर काढते. जर ते नीट काम करत नसेल तर पाणी एसीच्या आत पाईपमध्ये राहू शकते आणि एसी बिघडू शकतो.
एसी एअर फिल्टर बदलणं
एसी एअर फिल्टर दरवर्षी बदलणे खूप महत्वाचे आहे. असे नियमित न केल्यास एसीवरील दाब वाढतो. ज्यामुळे गॅस गळतीची शक्यता वाढते आणि पाईपमध्ये छिद्र देखील होऊ शकते.

​वाचाः Nothing Phone 1 एक जबरदस्त डील, मोठ्या डिस्काउंट सोबत खरेदीची संधी

​गॅस गळतीवर प्रतिबंध कसा लावायचा?

एअर कंडिशनर अर्थात एसीची वेळोवेळी सर्व्हिसिंग करून घ्यावी. एसी कंडेन्सर पाईपला गंजण्यापासून प्रतिबंधित केले पाहिजे. एसी तसंच त्याचा कॉम्प्रेसरजवळ कोणत्याही वस्तू ठेवू नयेत. घरातील पाळीव प्राणी तसंच पाण्यापासून एसी कॉम्प्रेसर दूर ठेवणं गरजेचं आहे. एसी ड्रेनेज योग्यरित्या वेळोवेळी तपासले गेले पाहिजे.

​वाचाः iPhone 14 Price : लेटेस्ट आयफोन घेण्यासाठी हीच आहे योग्य वेळ, लेटेस्ट मॉडेलवर खास ऑफर

Source link

ACAC Care एसीAir Conitionartech newsTips and Tricksएअर कंडीशनरएसी न्यूजटेक न्यूज
Comments (0)
Add Comment