हायलाइट्स:
- दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे दुर्घटना.
- दावल मलिक दर्गा तलावात बुडून तिघांचा मृत्यू.
- पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेजण बुडाले.
सोलापूर:दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी परिसरात असलेल्या दावल मलिक दर्गा येथील तलावात बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज घडली. या घटनेबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ( Three drowned in Solapur )
वाचा: मुंबईत बॉम्बची दहशत पसरवणाऱ्या कॉलचं गटारी कनेक्शन!; पोलीस हैराण
रिदाना तौफिक शेख (वय ३५), यासीन हारून शेख (वय ३५), मोहम्मद हारून सलीम शेख (वय ४१, सर्व रा. कुंभारी नवीन विडी घरकुल, ता. दक्षिण सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेजण धार्मिक कार्यासाठी बोरामणी येथील दावल मलिक दर्गा येथे गेले होते. धार्मिक कार्य उरकून परत येत असताना ते दुपारी जवळच असलेल्या तलावात गेले. तेथे पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेजण पाण्यात बुडाले.
वाचा:राज्यात करोनाचा ग्राफ घसरला; हॉटस्पॉट ठरलेल्या ‘या’ जिल्ह्यात आज फक्त २ नवे रुग्ण
तलावाजवळच असलेल्या ग्रामस्थांनी तिघांनाही पाण्याबाहेर काढले असता ते बेशुद्धावस्थेत होते. याबाबत सोलापूर तालुका पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस निरीक्षक अरुण फुगे आणि त्यांचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला आणि तिघांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु, उपचारापुर्वीच त्या तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
वाचा: मुंबई लोकलवरील निर्बंध कसे उठणार?; सूत्र ठरलं, ‘या’ मंत्र्याने दिली माहिती