मुलाने UPSC द्यावी म्हणून वडिलांनी विकले घर, IAS प्रदीप सिंह यांची संघर्षमय कहाणी

Success Story: बिहारच्या गोपालगंज येथील रहिवासी असलेले प्रदीप सिंह वयाच्या २३ व्या वर्षी २०२० मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून आयएएस अधिकारी बनले. इथपर्यंत पोहोचणे त्यांच्यासाठी अजिबात सोपे नव्हते. कारण त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. प्रदीपच्या अभ्यासासाठी वडिलांना घर विकावे लागले होतो.

प्रदीप सिंग हे मूळचे बिहारचे असून त्यांचे कुटुंब इंदूरमध्ये राहते. ते लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होते. प्रदीप यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण इंदूरमधूनच पूर्ण केले.

टाईम्स नाऊने यासंदर्भात दिलेल्या वृत्तानुसार, प्रदीप सिंह यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. बारावीनंतर यूपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. प्रदीपचे वडील पेट्रोल पंपावर काम करतात आणि आपल्या मुलाला दिल्लीला पाठवण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी घरही विकले.

बारावीनंतर प्रदीप सिंग दिल्लीत राहून यूपीएससी परीक्षेची तयारी करू लागले. वडिलांनी घर विकून शिकवल्यामुळे त्यांच्यावर खूप दबाव होता. आपण लवकरात लवकर यूपीएससी परीक्षा पास करून आयएएस अधिकारी बनून आपल्या कुटुंबाची इच्छा पूर्ण करुया, असे त्यांनी ठरविले.

प्रदीप सिंह यांनी २०१८ मध्ये पहिल्यांदा यूपीएससी परीक्षा दिली आणि संपूर्ण भारतात ९३ वा क्रमांक मिळवला. असे असले तरीही आयएएस पदासाठी त्यांची निवड झाली नाही. परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर प्रदीप यांची भारतीय महसूल सेवेत (IRS) नियुक्ती झाली.

यूपीएससी २०१८ मध्ये मी उत्तीर्ण झालो पण आयएएसपेक्षा फक्त एक रँक मागे राहिलो. यानंतर माझ्याकडे आयपीएस होण्याचा पर्यायही होता मात्र मी परराष्ट्र सेवेत रुजू झाले. त्यानंतर रजा घेतली आणि मग तयारी सुरू केल्याचे प्रदीप सांगतात.

एका रँकने आयएएस होण्यापासून वंचित राहिल्यानंतर प्रदीप सिंग खूप तणावाखाली होते. पण त्यांनी हार मानली नाही. एक वर्षाच्या तयारीनंतर त्यांनी पुन्हा परीक्षा दिली आणि ऑल इंडिया २६ वा क्रमांक मिळवला. यानंतर त्यांची आयएएस पदासाठी निवड झाली आणि त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले.

Source link

central governmentfarmerGovernment jobgovernment jobs examIAS OfficerIAS Pradeep SinghIAS Pradeep Singh Success Storyips officerjobs newsJobs News in MarathiPradeep Singhsuccess storyupscupsc aspirantUPSC examUPSC TopperUPSC Topper Success Story
Comments (0)
Add Comment