राज्यात १२ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. विदर्भ वगळता २०२३-२४ शैक्षणिक वर्ष १२ जूनपासून होणार सुरू होईल. गतवर्षीच्या तुलनेत यंदा शाळा लवकर सुरू होत आहेत.
राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक २०२३-२४ सुरु करण्याबाबत शिक्षण संचालकांनी पत्र काढल्याचे सांगण्यात येते. शाळांना दोन मे, मंगळवारपासून उन्हाळी सुट्टी सुरू होत आहे. यंदा सुट्टीचा कालावधी ११ जूनपर्यंत आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा नुकत्याच झाल्या.
त्यासह इतर इयत्तेच्या अनेक शाळांच्या परीक्षा संपल्या तर काहींच्या अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालकांचे उन्हाळी सुट्ट्या कधी लागणार याकडे लक्ष लागले होते. उन्हाळी सुट्टीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याचे अधिकारी सूत्रांनी सांगितले. त्यानुसार दोन मेपासून शाळा सुरू लागणार आहे. शाळांना यंदा उन्हाळी सुट्ट्या ४१ दिवसांच्या असणार आहेत. १२ जून रोजी नवीन शैक्षणिक सत्र सुरू होणार आहे.
विदर्भातील तापमान विचारात घेता तेथील शाळा २६ जूनपासून सुरू होतील असे सांगण्यात येते. उन्हाळी सुट्ट्यांकडे विद्यार्थ्यांसह पालकांचेही लक्ष असते. अखेर सुट्ट्यांचे वेळापत्रक आल्याने सुट्ट्यातील बाहेरगावी जाण्याच्या नियोजनाचे बेत विद्यार्थी, पालकांचे आखले जाण्याची शक्यता आहे.
इयत्तांचा निकाल ३० एप्रिलपर्यंत
इयत्ता पहिली ते नववी व इयत्ता अकरावीचा निकाल ३० एप्रिल रोजी अथवा त्यानंतर सुट्टीचा कालावधीत लावता येईल. तो निकाल विद्यार्थी, पालकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी संबंधित शाळेची राहील. शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव, नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या परवानगीने घेण्याबाबत निर्देश देण्यात आले. एकूण सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा अधिक होणार नाहीत, याची दक्षता घेण्याबाबतही स्पष्ट करण्यात आले.