देवघराची जागा बदलताय? तेव्हा अशी घ्या काळजी

घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर-पूर्व दिशेला देवघर बनवू शकता. देवघर ईशान्य दिशेलाच असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य (पश्चिम-दक्षिण) कोपऱ्यातून बाहेर जाते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. पण तुमच्या घरातील देवघर वास्तूनुसार चुकीच्या जागी असेल तर देवघर बदलताना या गोष्टी करा.

अशा ठिकाणी देवघर असावे

घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे, जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल. ज्या घरांमध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते, त्या घरांमधील विविध दोष आपोआप नष्ट होतात. सूर्य प्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक उर्जा नष्ट होते आणि सकारात्मक उर्जा वाढते, असे सांगितले जाते. पूजा घरातील दिवा, समई, निरांजन आग्नेय कोपऱ्यात ठेवावे तर धूप, उदबत्ती स्टँड वायव्य कोपऱ्यात ठेवावे.

अतिशय शांतपणे, मनात कुठलाही राग द्वेश नसेल अशावेळी देवघर बदलण्यास घ्यावे. अमावस्या सोडून शुभ दिवशी हे कार्य करावे. देवघराची जागा बदलण्याअगोदर दोन नारळ घ्यावयाचे आहे. एक नारळ जुन्या देवघराच्या जागी ठेवणे, दुसरा नारळ नवीन देवघराच्या जागी ठेवणे. हे नारळ पाटावर किंवा थाळीत ठेवा.

देवघराची जागा केव्हा बदलावी

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी देवघराची जागा बदलण्यास घ्यावी. पहिल्यांदा जुन्या देवघराच्या जागी दोन थाळ्या ठेवणे. एका थाळीत जे देव विसर्जीत करायचे आहेत ते घेणे आणि दुसऱ्या थाळीत जे देव देवघराबाहेर न्यायचे आहेत ते घेणे. देवाचे फोटो आणि मुर्त्या देवघरातून बाहेर काढताना दोन प्रकारच्या प्रार्थना करायच्या आहेत. ज्या मुर्त्या किंवा फोटो विसर्जीत करायच्या आहेत त्या प्रत्येक देवाची प्रार्थना घेवून नावानिशी नमस्कार करावा आणि देवाला नमस्कार करून देवासमोर क्षमा प्रार्थना मागावी. त्यानंतर एक चांगला मुहूर्त बघून त्या मुर्त्या फोटो आदरानिशी वाहत्या पाण्यात विसर्जीत करावे.

क्षमा प्रार्थना

नंतर जे फोटो मुर्त्या मंदिराबरोबर न्यायचे आहेत त्या प्रत्येक देवाची प्रार्थना घेवून नावानिशी नमस्कार करावा आणि पुढील प्रार्थना म्हणावी, “हे देवा आजपर्यंत आम्ही तुमची या जागेवर नित्य पूजा करत आलो होतो पण आज पासून आम्ही तुझी वास्तुशास्त्रानुसार योग्य जागी ठेवून पूजा करणार आहोत, त्यासाठी या जागेवरून आम्ही तुम्हाला हलवत आहोत. या जागेवरून तुम्हाला हलवत असाताना आमच्या हातून काही चूक घडली, काही अपराध झाल्यास आम्हाला क्षमा कर.”

नवीन मंदिराजवळ जाताना

प्रार्थना झाल्यानंतर आदरानिशी दुसऱ्या थाळीत घेऊन नवीन मंदिराजवळ जायचे आहे. नंतर नवीन मंदिरात व्यवस्थित फोटो, मुर्त्या मांडून प्रार्थना करावी. “हे देवांनो आज पासून आम्ही तुमची या जागेवरून नित्य पूजा करणार आहोत तेव्हा आमच्या पूजेचा स्वीकार करावा. आमची पूजा गोड माणून घ्यावी आणि आमच्या पूजेचे योग्य फळ आम्हाला प्राप्त व्हावे”. ही प्रार्थना.

दोघं नारळाचा असा करा वापर

नंतर नवीन मंदिराजवळ ठेवलेला नारळ फोडून गोड पदार्थ बनविण्यासाठी वापरावे आणि जुन्या मंदिराजवळील नारळ विसर्जनाच्या थाळीतील देव व घरात इतरत्र ठेवलेल्या देवांचे त्या त्या जागी जावून प्रार्थना घेवून, नमस्कार करून क्षमा मागावी व नारळासहित सर्व फोटोंटे विसर्जन करावे. काचेच्या फ्रेम मधून फोटो काढून विसर्जित करावे.

Source link

devghardevghar at home as per vastudevghar location at homehome templevastu shastra rulesvastu shastra rules about devgharदेवघरदेवघराची जागा बदलताना काय करावेवास्तुशास्त्र
Comments (0)
Add Comment