सातारा : तेजल साळुंखे ही युवती हरतळी (ता. खंडाळा) गावाच्या हद्दीत नीरा नदीपात्रात काल बुडाली होती. या घटनेची माहिती मिळताच शिरवळ रेस्क्यू टीम, प्रतापगड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स यांना पाचारण केले होते.या टीमच्या सदस्यांच्या सहकार्याने नीरा नदी पात्रात शिरवळ पोलिसांकडून शोध मोहीम राबविली. रात्री उशिरापर्यंत युवती न सापडल्याने आज सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. शोध सुरू असताना हरतळी गावाच्या हद्दीत स्मशानभूमीजवळ नीरा नदी पात्रात तिचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी एका युवकाला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पुणे व सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील सातारा जिल्ह्यातील खटाव येथील वरुड येथील युवती तेजल साळुंखे भाटघर धरणाच्या परिसरात फिरण्यासाठी गेली होती. हरतळी (ता. खंडाळा) हद्दीत असणाऱ्या एका पुलाजवळील नीरा नदीपात्रात तेजल साळुंखे ही उतरली असता पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात पडली. भाटघर धरणाच्या पावर हाऊसमधून नदीपात्रात पाणी सोडल्याने पाण्याचा वेग जास्त असल्याने बुडून बेपत्ता झाली. या घटनेची माहिती भोर पोलीस स्टेशनला एका युवकानं दिली होती. भोर पोलीस, शिरवळ पोलीस त्यानंतर घटनास्थळी तातडीने दाखल झाले. मंगळवारी शिरवळ रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड रेस्क्यू टीमच्या सहकार्याने शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, पोलीस अंमलदार आप्पासाहेब कोलवडकर, अजित बोराटे यांनी नीरा नदीपात्रात शोधमोहीम राबविली होती. रात्री उशिरा शोधमोहिम थांबवण्यात आली.

तेजल साळुंखे न सापडल्याने आज सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. शोध सुरू असताना हरतळी गावाच्या हद्दीत स्मशानभूमीजवळ नीरा नदी पात्रात तिचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी दिगंबर साळेकर (रा. निगुडघर, ता. भोर, जि. पुणे) याला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदनासाठी तिचा मृतदेह सातारा जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बर्डे, पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, पोलीस अंमलदार आप्पासाहेब कोलवडकर, मधुकर कुंभार, संजय सपकाळ, अजित बोराटे, तुषार अभंग, शिवराज जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली.
घाईगडबडीत कर्ज हवं म्हणून अॅपवरून पैसे घेताय? थांबा ! लोन अॅप घोटाळा समजून घ्या