D-Mart, Big Basket, Big Bazar च्या नावाने मोठा गंडा घातला जातोय, पाहा डिटेल्स

नवी दिल्लीः सायबर फ्रॉडचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. नोएडा पोलिसांनी नुकतीच D-Mart, Big Basket आणि Big Bazar च्या फेक वेबसाइट बनवणाऱ्या सायबर गुन्हेगाराला पकडले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ६ लोकांना अटक केली आहे. या वेबसाइटद्वारे स्कॅमर्स लोकांची फसवणूक करीत होते. या वेबसाइटवर खूपच कमी पैशात प्रोडक्ट्सची विक्री करीत होते.

या ठिकाणी लोकांची फसवणूक करण्यासाठी जास्त डिस्काउंटचे अमीष दाखवले गेले होते. या ठिकाणाहून यूजर ऑनलाइन पेमेंट करीत असाल तर स्कॅमर्स त्याच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डची डिटेल्स चोरी करीत होते. सोबत अकाउंटही रिकामे करीत होते. परंतु, तुम्ही या फेक वेबसाइट्सला ओळखू शकतात. तसेच त्यापासून सुरक्षित राहू शकतात. जाणून घ्या फेक वेबसाइट्स कशा ओळखायच्या.

डोमेन नाव
जर कोणत्याही वेबसाइटवर जात असल्यास सर्वात आधी त्याचे डोमेन नाव चेक करा. जर वेबसाइट फेक असेल तर त्यात कोणता तरी बदल केलेला असेल. कारण, स्कॅमर यूआरएल आणि डोमेन एक्सटेंशन बदलत असतात. उदाहर्णार्थ amazon.com ऐवजी amaz0n.com किंवा amazon.org असे करतात.

पॅडलॉक साइन चेक करा
जर तुम्ही कोणत्याही वेबसाइटवर जात असेल तर सर्वात आधी त्याची यूआरएलच्या उजव्या बाजुला पॅडलॉक जरूर पाहा. हे पॅडलॉक संकेत देतात की वेबसाइट दरम्या पाठवलेला डेटाला एन्क्रिप्ट करते. जर वेबसाइटला टीएलएस किंवा एसएसएल सर्टिफिकेट जारी केले जात नाही. तर अॅड्रेसमध्ये डोमेन नावाच्या डाव्या बाजुला एक एक्सक्लेमेशन साइन (!) दिसेल.

अशी डील्स जी खरी वाटणार नाही
जर तुम्हाला अशी कोणतीही ऑफर दिसली जी खरी वाटत नाही. तर ती फेक असू शकते. म्हणजेच तुम्हाला कुणी तरी ८० टक्के डिस्काउंट देत असेल तर या ऑफरला पुन्हा एकदा चेक करा.

वाचाः Ray Kurzweil : पुढील ७ वर्षांत माणूस अमर होणार? गुगलच्या माजी कर्मचाऱ्याचा दावा

स्पेलिंग्स
फेस वेबसाइट वर नेहमी ग्रामर, स्पेलिंग आणि डिझाइन मध्ये चुका पाहायला मिळतील. त्यामुळे वेबसाइटवर हे सर्वात आधी चेक करा.

ऑनलाइन रिव्ह्यू वाचा
प्रत्येक वेबसाइट्सचे रिव्ह्यू ऑनलाइन उपलब्ध असतात. जर तुम्हाला वेबसाइट फेक आहे, असा संशय आल्यास त्याचा रिव्ह्यू जरूर वाचा.

वाचाः LG कंपनीच्या या दमदार वॉशिंग मशीनवर बंपर डिस्काऊंट, १९ हजारांच्या सूटसोबत १० वर्षांची वॉरंटी

Source link

fake websitefake websitesfake websites for shoppingfake websites fraudsfake websites on googleसायबर फ्रॉड
Comments (0)
Add Comment