Hanuman Jayanti Wishes: जय बजरंगबली की जय; हनुमान जयंतीला या शुभेच्छा संदेशाचा होईल उपयोग, वाचा आणि पाठवा

हनुमंत, मारूती, बजरंगबली, रामभक्त, आंजनेय, महावीर, पवनपुत्र, पवनसुत, केसरीनंदन अशा अनेक नावाने संबोधल्या जाणाऱ्या हनुमानाची जयंती देशभरात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. आज गुरुवार, ६ एप्रिल २०२३ रोजी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. चैत्र शुद्ध पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला. त्यामुळे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती म्हणून ओळखली जाते. या दिवशीही आपण आपल्या नातेवाईकांना, आप्तस्वकीयांना, मित्र, मैत्रिणींना शुभेच्छा देऊया. तेव्हा हे शुभेच्छा संदेश वाचा, स्टेटस ठेवा आणि पाठवा.

हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

“ज्याच्या मनात आहे श्रीराम,
ज्याच्या तनात आहे श्रीराम,
संपूर्ण विश्वात जो आहे बलवान
अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा”

‘भूतप्रेतसमंधादी,
रोगव्याधी समस्तही,
नासती तूटती चिंता,
आनंदे भीमदर्शनें”
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

हनुमान जयंतीच्या शुभेच्छा २०२३

“रामाचा भक्त तू, वाऱ्याचा पुत्र तू,
शत्रूची करतोस दाणादाण
तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम…
अशा बजरंग बलीला आमचे कोटी कोटी प्रणाम”
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

“भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात आनंद,
शांती आणि समृद्धी मिळवून देवो
आणि त्याची कृपादृष्टी आपल्या परिवारावर कायम राहो”
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा

“ज्याच्या तनी मनी वसतो राम
जो साऱ्यांमध्ये असे बलवान
असा सर्व जगी न्यारा नाव त्यांचे हनुमान”

“सुर्याचा घ्यायला गेला घास,
जो वीरांचा आहे खास,
त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान
असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान”
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

“मुखी राम नाम जपी,
योगी बलवान लंकेचा नाश करी,
असा सर्व शक्तिमान,
आकाशापरी मोठा,
कधी मुंगीहूनी लहान,
ह्रदयी वसती राम असा भक्त हनुमान…”
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

“अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान…
एक मुखाने बोला…
जय जय हनुमान…”
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Source link

hanuman jayanti 2023hanuman jayanti 2023 shubhechhahanuman jayanti imageshanuman jayanti quotes messageshanuman jayanti statushanuman jayanti wishes in marathiहनुमान जयंती 2023हनुमान जयंती शुभेच्छाहनुमान जयंती स्टेटस
Comments (0)
Add Comment