फास्ट चार्जिंगमुळे तुमचा फोन खराब होऊ शकतो?
फास्ट चार्जिंग ज्यामुळे मोबाईल फोन जलदगतीने चार्ज होतो. फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानामध्ये क्वालकॉमचा क्विक चार्ज, वनप्लसचा डॅश चार्ज आणि सॅमसंगचा फास्ट चार्ज यांचा समावेश होतो. दरम्यान फास्ट चार्जिंगच्या मदतीने फोन तासांऐवजी काही मिनिटांत चार्ज होऊ शकतो. पण याच
फास्ट चार्जिंगची एक समस्या म्हणजे यामुळे हीट निर्माण होते. मोबाईल चार्ज करताना उष्णता निर्माण झाल्याने मोबाईल तापतो आणि बॅटरी खराब होऊ शकते. फोनच्या अंतर्गत भागांवरही याचा परिणाम होऊ शकतो. अनेक नवीन स्मार्टफोन्समध्ये इनबिल्ड तापमान सेन्सर असतात जे चार्जिंग दरम्यान तापमान नियंत्रित करतात. हे सेन्सर फोनला जास्त गरम होण्यापासून किंवा कोणत्याही प्रकारचे नुकसान होण्यापासून वाचवतात.
वाचा: Xiaomi : शाओमीचं फॅन फेस्टिवल, स्मार्टफोन, स्मार्ट टीव्हीवर बंपर डिस्काऊंट, किंमती वाचून चकित व्हाल!
खराब बॅटरी लाईफ
काही युजर्सचा असाही दावा आहे की फास्ट चार्जिंगचा मोबाईल फोनच्या बॅटरीवरही परिणाम होतो. मोबाइल फोनमध्ये सामान्यतः वापरल्या जाणार्या लिथियम बॅटरीजमध्ये मर्यादित चार्ज सायकल असतात. बॅटरी जितकी अधिक चार्ज आणि डिस्चार्ज होते त्यातून ती तितकी कमी होते. त्यामुळे फास्ट चार्जिंगमुळे बॅटरीचे आयुष्य देखील कमी होते. मात्र, या प्रकरणातही कंपन्यांनी बॅटरी संपणार नाही अशा पद्धतीने फास्ट चार्जिंगची रचना केली आहे. या पद्धतीला ट्रिकल चार्जिंग म्हणतात जी बॅटरी एका विशिष्ट स्तरावर पोहोचल्यानंतर वेगवान चार्जिंगचा वेग कमी करते. या तंत्राद्वारे, बॅटरी जास्त चार्ज होणार नाही याची खात्री केली जाते.
यासोबतच काही लेटेस्ट फोन्समध्ये अॅडॉप्टिव्ह चार्जिंग देखील येते. हे वापरकर्त्याची चार्जिंगची सवय समजून चार्जिंग गती समायोजित करते. हे वैशिष्ट्य बॅटरी ओव्हरचार्जिंग देखील टाळते.मोबाईल फोनमध्ये फास्ट चार्जिंग हे एक आवश्यक वैशिष्ट्य बनलं आहे. त्यात अनेक कंपन्यांनी फास्ट चार्जिंगची रचना अशा प्रकारे केली आहे की ज्यामुळे बॅटरी अधिक वाचवता येईल आणि स्मार्टफोनला कोणताही धोका यामुळे होणार नाही. त्यामुळे तूर्तास तरी फास्ट चार्जिंगमुळे फोन खराब होतात अशी कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. पण फोन फक्त ब्रँडेड चार्जरने चार्ज करावा आणि थेट सूर्यप्रकाशासारख्या अतिशय उष्ण वातावरणात फोन चार्ज करू नये, या काही काळजी घेणंही तितकच महत्त्वाचं आहे.
वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन